UttarPradeshNewsUpdate : मृत्यूनंतरही जातीयवाद संपेना , मृतदेहावरील अंत्यसंस्कार थांबवले… !!

कोरोना सारख्या व्हायरसने उच्च -निच्चतेचे बांध तोडून टाकलेले असताना आणि समाजातील विषमतेची दरी कायद्याचे सुरक्षाकवच असतानाही कमी होत नसल्याची प्रचिती सातत्याने येत आहे. उत्तर प्रदेशमध्ये माणुसकीला काळीमा फासणारे असेच एक प्रकरण समोर आलं आहे. आग्रा येथील नट समाजातील महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या पार्थिवाववार गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्काराची तयारी तयारी सुरू असतानाच गावातील काही लोकं तेथे पोहचले आणि त्यांनी जबरदस्तीने अंत्यसंस्कार थांबवले . हा गोंधळ चालू असताना पोलिसही घटनास्थळी पोहोचले परंतु त्यांनी यावर कुठलीही कारवाई केली नाही. विशेष म्हणजे अर्धवट अंत्यसंस्कार थांबवून पोलिसांच्या उपस्थितीत असहाय्य नट समाजातील लोकांनी त्या महिलेचे शव घेऊन दुसऱ्या ठिकाणी नेऊन अंत्यसंस्कार केले.
या प्रकरणाचा व्हिडीओही व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना आग्राच्या अछनेरा परिसरातील रायभा इथं घडली. नट समाजातील 25 वर्षांची पूजा हिचा मृ्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे महिलेचा मृतदेह घेऊन कुटुंबीय स्मशानभूमीत पोहोचले. थोड्याच वेळात ठाकूर समाजातील काही लोक आले आणि त्यांनी निषेध करण्यास सुरवात केली. अखेर, त्या महिलेच्या मृतदेहावर दुसरीकडे अंत्यसंस्कार करण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे मृतदेहाला अग्नी देण्यात येणार होता. मात्र या विरोधामुळे चिता विझवून मृतदेह बाहेर काढण्यात आला.
दरम्यान या वादानंतर अछनेरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी हा गोंधळ थांबवला, मात्र आरोपींवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. या परिस्थितीत तहसील किरावली गावात नट समाजातील महिलेचा मृतदेह काढून अन्य ठिकाणी अंतिम संस्कार करण्यास भाग पाडले. विशेष म्हणजे उच्च समाजातील स्मशानभूमीवर मृतदेह जाळण्याच्या वादात पोलिसांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. तसेच, पीडित कुटुंबाला कोणतीही मदत केली नाही, असे आरोप करण्यात येत आहेत.