Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पुण्यातील कोंढवा परिसरात सावकाराची निघृण हत्या… तिघांना अटक

Advertisements
Advertisements
Spread the love

पुण्यात 9 जुलै रोजी कोंढवा परिसरात एका सावकाराची निघृण हत्या करण्यात आली होती. हा प्रकार 11 जुलै रोजी घनश्याम उर्फ पप्पू पडवळ (वय 51) असे खून झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी लतिफ बाबू शेख (वय 43), शुभम प्रमोद कासवेकर (वय 24) आणि शुभम संतोष उबाळे (वय 22) या तिघांना अटक केली आहे. तसेच यातील मयत व्यक्ती हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर बारा गंभीर गुन्ह्याची नोंद आहे.

Advertisements

मुख्य आरोपी लतीफ शेख याने पप्पू पडवळ त्याच्याकडून चार वर्षापूर्वी व्याजाने पन्नास लाख रुपये घेतले होते. त्याबदल्यात त्याला आतापर्यंत दोन कोटी रुपये दिले होते. परंतु पप्पू पडवळ त्याच्याकडे आणखी 80 लाख रुपये मागत होता आणि पैसे न दिल्यास ठार मारण्याची धमकी देत होता. त्यामुळे लतीफ याने पप्पू पडवळ याला ठार मारण्याचा कट रचला.

Advertisements
Advertisements

लतीफ शेख याची आई आजारी असताना एका मौलवीने दिलेल्या औषधामुळे ती बरी झाली होती. ही माहिती त्याने पप्पू पडवळ त्याला दिली होती. पडवळ सुद्धा आजारी पडत असल्यामुळे त्याने मौलवीला घेऊन लतीफला घरी बोलवले होते. हीच संधी साधून लतीफने पप्पू पडवळला मारण्याचा कट रचला. त्यासाठी त्याने इतर दोन आरोपींना दहा लाख रुपयांचे आमिष दाखवून आपल्या सोबत घेतले. नऊ जुलैच्या रात्री लतीफ शेखने इतर दोघांना मौलवी असल्याचे भासवून पडवळच्या फ्लॅटमध्ये नेले. त्यानंतर तिघांनी मिळून पडवळवर कोयत्याने 50 ते 55 वार करत त्याची निर्घृण हत्या केली होती. आरोपींनी कुठलाही पुरावा मागे ठेवला नव्हता. पडवळाच्या घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआरही ते घेऊन गेले होते.

हा प्रकार दोन दिवसानंतर उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि तपासाला सुरुवात केली. तपासादरम्यान पोलिसांना लतीफ याने पप्पू पडवळ यांच्याकडून पन्नास लाख रुपयाचे कर्ज घेतले असल्याचे समजले आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली तेव्हा त्याने खून केल्याची कबुली दिली. दरम्यान लतीफने पडवळला पन्नास लाखाच्या बदल्यात दोन कोटी देऊनही तो आणखी 80 लाख मागत होता. तसेच लतीफ राहत असलेला फ्लॅट स्वतःच्या नावावर करून घेण्यासाठी दबाव टाकत होता. तसेच लतीफ शेख यांच्या घरातील महिलांविषयी वाईट बोलत होता. त्यामुळे हा खून केल्याचे त्याने सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!