HSCResult2020 : बारावीचा निकाल जाहीर, ९०.६६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दुपारी १ वाजल्यापासून निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा एकूण निकाल ९०.६६ टक्के लागला आहे. कोकण मंडळाचा निकाल सर्वाधिक ९५.८ टक्के लागला आहे तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी (८८.१८ टक्के) आहे. मागील वर्षीच्या तुलनेत निकाल ४.७८ टक्क्यांनी वाढला आहे. यंदाही मुलीच सरस ठरल्या आहेत. ९३.८८ टक्के विद्यार्थिनी तर ८८.०४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची इयत्ता बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारीपासून सुरू झाली होती. राज्यभरात एकूण १५ लाख ५ हजार २७ विद्यार्थ्यांनी परीक्षेला नोंदणी केली होती.
राज्याचा एकूण निकाल ९०.६६ टक्के
– यंदा निकाल ४.७८ टक्क्यांनी वाढला
शाखानिहाय निकाल :
– कला शाखा निकाल : ८२.६३ टक्के
– वाणिज्य शाखा निकाल : ९१.२७ टक्के
– विज्ञान शाखा निकाल : ९६.९३ टक्के
– MCVC : ९५.०७ टक्के
परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या एकूण १५,०५,०२७ विद्यार्थ्यांपैकी ८,४३,५५२ विद्यार्थी तर ६,६१,३२५ विद्यार्थिनी आहेत. राज्यभर एकूण ३,०३६ परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली होती.
मंडळनिहाय निकाल
विभाग – टक्केवारी
पुणे – ९२.५०
नागपूर – ९१.६५
औरंगाबाद – ८८.१८
मुंबई – ८९.३५
कोल्हापूर – ९२.४२
अमरावती – ९२.०९
नाशिक – ८८.८७
लातूर – ८९.७९
कोकण – ९५.८९
एकूण – ९०.६६
परीक्षेला बसलेले शाखानिहाय विद्यार्थी –
विज्ञान – ५,८५,७३६
कला – ४,७५,१३४
वाणिज्य – ३,८६, ७८४
व्होकेशनल – ५७,३७३
एकूण – १५,०५, ०२७
ऑनलाइन गुणपडताळणी, पुनर्मूल्यांकन, छायाप्रतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक पुढीलप्रमाणे –
http://verification.mh-hsc.ac.in/