तबलिगी प्रकरणात दोन दिवसात पुरावे सादर करा- खंडपीठाचे आदेश

औरंगाबाद – दिल्ली येथे झालेल्या मार्च २०२० च्या मरकज धार्मिक सभेत उपस्थित असलेल्या नागरिकांचे पुरावे सादर करण्याचे आदेश खंडपीठाने राज्य सरकारला दिले आहेत. गेल्या दीड महिन्यांपूर्वी मरकजसाठी दिल्लीमधे भरलेल्या धार्मिक सभेत हजर असल्यामुळे अहमदनगर आणि औरंगाबाद यैथील काही नागरिकांवर कोरोना फैलाव केल्यामुळे गुन्हे दाखल झाले होते. त्या नागरिकांनी खंडपीठात धाव घेत त्यांच्यावरील एफ.आय..आर. रद्द करावा अशी याचिका असलबिन मोहम्मद नूर आणि हमद अब्दुलकदर बनोटा यांनी दाखल केली होती.त्या याचिकेची सुनावणी काल १३जुलै रोजी झाली.न्यायमूर्ती टि.व्ही.नलावडे आणि न्यायमूर्ती एम.जी.सेवलीकर यांनी आदेशात म्हटले की, जे नागरिक मरकजसाठी हजर होते .त्यांचे प्रवासासंदर्भातील तिकीटे, प्रवेश पासेस आणि इतर संबंधित दस्तऐवज खंडपीठापुढे येत्या दोन दिवसात १६जुलै पर्यंत दाखल करावेत. या प्रकरणात याचिका कर्त्यातर्फे अॅड.शेख मजहर जहागिरदार यांनी काम पाहिले तर सरकार तर्फे अॅड.एम.एम.नेरलीकर यांनी काम पाहिले