Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मोठी बातमी : अमिताभ बच्चन यांच्या पाठोपाठ अभिषेक बच्चन यांनाही कोरोना

Advertisements
Advertisements
Spread the love

अमिताभ बच्चन यांच्या पाठोपाठ त्यांचे चिरंजीव अभिनेते  अभिषेक बच्चनही करोना पॉझिटिव्ह असल्याचं  ट्विट त्यांनी केलं आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण कोरोना  झाल्याची बातमी समोर आलेली असतानाच आता त्यांचा मुलगा आणि अभिनेता अभिषेकसुद्धा कोरोना  पॉझिटिव्ह असल्याचं निदान झालं आहे. मात्र आपल्या दोघांनाही कोरोनाची सौम्य लक्षणे असल्याची माहितीही अभिषेक यांनी दिली आहे.

Advertisements

अमिताभ यांनी स्वतःच त्यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी ट्विट  करून दिली. आता मुलगा अभिषेकसुद्धा पॉझिटिव्ह आला आहे. अमिताभ यांच्या जलसा आणि जनक या बंगल्यात राहणाऱ्या सर्वांची आता कोरोनाची चाचणी होणार आहे. अमिताभ यांच्या चाहत्यांनी रुग्णालयाबाहेर गर्दी करू नये यासाठी नानावटी हॉस्पिटलबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुंबईतील नानावटी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.बच्चन यांनीच ट्वीटरवरून चाहत्यांना ही माहिती दिली आहे. ‘गेल्या 10 दिवसांत माझ्या संपर्कात असलेल्या सर्वांनी कृपया कोरोना  टेस्ट करून घ्यावी’, अशी विनंती त्यांनी ट्विट करून केली आहे.’

Advertisements
Advertisements

रेखासह या अभिनेत्यांनाही कोरोनाचा धक्का

दरम्यान दिग्दर्शक करण जोहर, अभिनेत्री जान्हवी कपूर आणि अभिनेता अमिर खान यांच्यानंतर अभिनेत्री रेखा यांचा सुरक्षा रक्षक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. त्यांचा मुंबईतील बंगला पालिकेकडून सील करण्यात आला आहे. त्याशिवाय रेखा यांच्या बंगाल्याच्या बाहेर पालिकेने नोटीसही जारी केली आहे. त्यांचा बंगला वांद्रे येथील बॅडस्टॅंड भागात आहे. त्यांच्या घराची रक्षा करण्यासाठी कायम दोन  सुरक्षा रक्षक तैनात असतात. त्यापैकी एकाला कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पालिकेकडून रेखा यांचा संपूर्ण बंगला सॅनिटाईझ करण्यात आला आहे. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!