Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

BreakingNews : अमिताभ बच्चन यांना कोरोना !!

Advertisements
Advertisements
Spread the love

ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना करोनाची लागण झाली असून आज सायंकाळी मुंबईतील नानावटी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे. याबाबत स्वतः  अमिताभ बच्चन यांनीच ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे. अमिताभ बच्चन यांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आपण रुग्णालयात दाखल झालो आहे, असे अमिताभ यांनी नमूद केले आहे. नानावटी रुग्णालयाच्या प्रवक्त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. घरातील इतर लोक आणि कर्मचाऱ्यांचा अहवाल येणे बाकी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Advertisements

दरम्यान अमिताभ यांना करोनाची लागण झाल्याचे वृत्त त्यांनी स्वतः ट्विटरच्या माध्यमातून दिल्यानंतर त्यांच्या प्रकृतीस्वास्थ्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी प्रार्थना सुरु केल्या आहेत.  आज सायंकाळी त्यांना रुग्णायलात दाखल करण्यात आलं. त्यानंतर रात्री १० वाजून ५२ मिनिटांना त्यांनी ट्विट केलं व तपशील दिला. माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयाने संबंधित यंत्रणांना याबाबत कळवलं आहे. घरातील अन्य सदस्य आणि स्टाफचे स्वॅबही तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. त्यांचा करोना चाचणी अहवाल अजून आलेला नाही. त्याची प्रतीक्षा आहे, असे नमूद करतानाच अमिताभ यांनी संपर्कातील अन्य व्यक्तींनाही आवाहन केलं आहे. गेल्या दहा दिवसांच माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कृपया करोना चाचणी करून घ्यावी, अशी विनंती अमिताभ यांनी केली आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!