AurangabadCrimeUpdate : रेकाॅर्डवरील गुन्हेगाराचा लाकडी दांड्याने खून, तीन अटक

औरंगाबाद – आई आणि बहीणीला घरी येऊन दारुच्या नशेत शिवीगाळ करणार्या रेकाॅर्डवरच्या गुन्हेगाराला डोक्यात लाकडी दांडा घालून ठार मारले. या प्रकरणी वाळूज औद्योगिक पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. या प्रकरणी मयताचा लहान भाऊ रामकिशन पाटोळे (३४) याच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाला आहे
अजय दहातोंडे(२५ अंदाजे) कृष्णा साळे(५०) एकनाथ साळे(५१) सर्व रा.वडगाव कोल्हाटी अशी अटक आरौपींची नावे आहेत. यांना बाळू वामन पाटोळे (३५) रा.वडगाव कोल्हाटी याचा खून वरील आरोपींनी केल्याचे पोलिसांनी सांगितले.काल संध्याकाळी(शुक्रवारी)८वाजेच्या सुमारास मयत बाळू हा अजय दहातोंडेच्या घरी दारुच्या नशेत येऊन शिवीगाळ करुन गेला. थोड्यावेळाने अजय घरी येताच अजयला हा प्रकार त्याच्या आईने सांगितला.म्हणून संतापलेल्या अजयने लाकडी दांडा हातात घेऊन परिसरातील लहान मुलांना बाळू कुठे असे विचारले.बाळू थोड्या अंतरावर पत्ते खेळंत असल्याचे गल्लीतल्या मुलाने अजयला सांगितले.अटक अजय ने बाळू च्या पाठीमागून जात त्याच्या डोक्यात तीन वार केले.तिसर्या वार मधे बाळू ने जीव सोडला याची खात्री अजयने केली.व तिथून घरी परतला.
बाळू वामन पाटोळे याच्यावर वाळूज औद्योगिक पोलिसांनी एम.पी.डी.ए. कारवाई केली होती.बाळू ची आई हौसाबाई पाटोळे या वडगाव कोल्हाटीच्या उपसरपंच होत्या. ९ महिन्यांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला.रिक्त झालेल्या जागेवर पोट निवडणूक होऊन मयत बाळू ची भावजाय राणी पाटोळे बिनविरोध निवडून आल्या.त्यावेळी दहातोंडे आणि पाटोळे कुटुंबांचे भांडणे झाली होती.त्याचा पर्यवसन बाळू पाटोळे चा खून करण्यात झाले. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय विजय घेरडे करंत आहेत.
गल्ली बोळात घडलेल्या घटना
लाॅकडाऊनच्या काळात वाळूज औद्योगिक पोलिस ठाण्याच्या हद्दीत गॅंगवार मधून दोन तर अनैतिक संबंधातून एक असे तीन खून झाले.१६एप्रिल रोजी ठेकेदाराचा खून १७ मे रोजी योगेश प्रधान या प्रधान गॅंगमधील गुंडाचा खून आणि १०जून रोजी रेकाॅर्डवरील गुन्हेगार बाळू पाटोळे चा खून झाला.या तिन्ही घटना पोलिसांचा वचक या भागात नाही असे म्हणणे योग्य ठरणार नाही कारण या घटना शहर गल्ली बोळात घडलेल्या आहेत. गस्तीवर पोलिस असतांना गल्ली बोळांमधून शुकशुकाट दिसतो पोलिस पुढे निघाले की, लौक पत्ते खेळंत बसतात. मयत बाळू पाटोळे च्या एम.पी.डी.ए. प्रकरणात पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत धडक मारली होती.वाळूज औद्योगिक परिसरातील प्रधान आणि साळे गॅंगवर संघटित गुन्हैगारी अंतर्गत मोक्का लावण्याची प्रक्रिया आम्ही सुरु केली आहे.