AurangabadNewsUpdate : आ.नारायण कुचेंच्या विरोधात भाच्याचा मानसिक छळ केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे खंडपीठाचे आदेश

औरंगाबाद – बदनापुर चे आमदार नारायण कुचे व अन्य दोघांच्या विरोधात जालना पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्या.टि.व्ही.नलावडे आणि न्या. श्रीकांत कुलकर्णी यांच्या खंडपीठाने चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.व याचिका कर्ते व त्यांच्या कुटुंबियांना पोलिस संरक्षण देण्याबाबतही आदेश बजावले आहेत.
दिपक डोंगरे यांच्या याचिकेवरुन वरील निर्णय खंडपीठाने दिला. बदनापूर तालुक्यातील मंडेलगाव येथे राहणारे दिपक लक्ष्मण डोंगरे (२५) धंदा व्यापार हे आ.नारायण कुचे यांचे भाचे आहेत. गेल्या २ मार्च रोजी आ.कुचे यांचे बंधू देविदास कुचे यांच्या सांगण्यावरुन बदनापुरच्या फार्मसी काॅलेज मधील महिला शिपायाच्या मोबाईल वरुन दिपक डोंगरे यांना आक्षेपार्ह मॅसेज पाठवण्यात आले.
या प्रकरणी डोंगरे यांनी चंदनझिरा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी महिला शिपायाचा जबाब नोंदवल्यानंतर वरील बाब स्पष्ट झाली. म्हणून या प्रकरणात जालना पोलिस अधिक्षकांन लक्ष घालून आ.कुचेंवर गुन्हा दाखल करण्यासाठी डोंगरे यांनी पोलिस अधिक्षकांकडे ९ जून रोजी तक्रार दिली होती.पण पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्यामुळे डोंगरे यांनी अॅ.रविंद्र गोरे यांच्या मार्फत खंडपीठात आ. कुचे व एका महिले सहित देविदास कुचे यांच्या विरोधात फौजदारी याचिका दाखल केली. वरील याचिकेवर खंडपीठाने वरील आदेश दिले.