AurangabadCrimeUpdate : वाहतूक कर्मचार्याला दगड फेकून मारला, दोघे अटक

औरंगाबाद – राॅंगसाईड मोटरसायकल चालवणार्या दोघांना वाहतूक पोलिसाने अडवताच त्याला दगड फेकून मारणार्या दोघांना सातारा पोलिसांनी अटक केली.
सुभाष विश्र्वनाथ देवरे रा. पिसादेवी आणि किशोर भागवत रा. शिवाजीनगर अशी अटक आरोपींची नावे आहेत. आज दुपारी १च्या सुमारास गोदावरी टि.पाॅईंट या ठिकाणी कर्तव्य बजावणारे वाहतूक पोलिस कर्मचारी राजू गरीबदास कोतवाल (५१) यांनी वरील आरोपींना एम.आयटी. महाविद्यालयाकडून राॅंग साईड येतांना अडवले याचा आरोपींना राग आला.वरील पैकी सुभाष देवरे याने रस्त्यावरुन दगड उचलून कोतवाल यांना डोक्यावर मारला.त्यामुळै कोतवाल यांच्या डोक्याला जखम झाली आहे.वरील प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास एपीआय कराळे करंत आहेत अशी माहिती पी.एस. ओ. बबन शिंदे यांनी दिली.