AurangabadCrimeUpdate : घाटीतून पळालेला खुनाचा आरोपी अखेर जेरबंद

औरंगाबाद -गेल्या मार्च महिन्यात जवाहरनगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल असलेला आरोपीला घाटीतून पळाल्यानंतर जवाहरपोलिसांनी आज पहाटे २वा. त्याच्या राहत्या घरातून अटक केली.
गेल्या १८ मार्च रोजी रात्री ९.३० वा.संग्रामनगर उड्डाणपुलाजवळ अक्षय प्रधान रा.सुतगिरणी चौक याचा सापाचा धाक दाखवून इम्रान बेग(२५) आणि सोहेल शेख यांनी खून केला होता. वरील प्रकरणात इम्रान बेग हा हर्सूल कारागृहात असतांना घाटी रुग्णालयात १९जून रोजी उपचार चालू असतांना पळून गेला हौता. पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांना खबर्याने आरोपी त्याच्या राहत्या घरी काबरानगर मधे आल्याचे सांगताच जवाहरनगर पोलिसांनी इम्रानला पकडले. वरील कारवाईत पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय श्रध्दा वायदंडे, पीएसआय भरत पाचोळे यांनीही सहभाग घेतला होता.