AurangabadCrimeUpdate : सव्वा लाखाची लाच घेतली, लोकविकास बॅंकेचे अध्यक्ष जे.के. जाधव यांच्यासह त्यांच्या लेखापालास अटक

औरंगाबाद – लोकविकास बॅंकेचे अध्यक्ष जगन्नाथ खंडेराव उर्फ जे.के. जाधव(७०) आणि त्याच्या अकाऊंटंटला जे.के. जाधवच्याच मालकीच्या राजर्षी शाहू महिवाद्यालयात आज(गुरुवार) दुपारी दोन वा.१ लाख २५ हजार रु.ची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बेड्या ठोकल्या.या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
जे.के. जाधव ने तक्रारदाराचे ८ लाख रु.चे कर्ज मंजूर केले होते. आणखी कर्ज मंजूर करण्यासाठी आरोपी जाधव ने तक्रारदाराकडे सव्वालाख रुपयांची मागणी मंगळवारी केली होती. त्यानुसार तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे फिर्याद देताच पोलिस निरीक्षक संदीप राजपूत यांनी सिडकोतील गरवारे कंपनीच्या मागे असलेल्या राजर्षी शाहू महाविद्यालयात सापळा लावला. फिर्यादी दुपारी पैशे घेऊन आल्यानंतर जे.के.जाधव ला भेटले आरोपी जाधव ने फिर्यादीला हे पैशे त्याचा अकाउंटंट आत्माराम पवार याच्याकडे देण्यास सांगितले.फिर्यादीने पैशे देताच जाधव आणि पवार ला एसीबी ने ताब्यात घेतले.दरम्यान एसीबी कडून जे.के. जाधवच्या घराची झडती घेण्याचे काम सुरु होते. भाजपाचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव हे आरोपीचे मोठे बंधू आहेत. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीप राजपूत करंत आहेत