CrimeNewsUpdate : गुन्हे शाखेने पकडले ९९ लाखाचे बाद झालेले चलन, चार आरोपी गजाआड

औरंगाबाद – गुन्हेशाखेने २०१६ साली चलनातून बाद झालेल्या ९८ लाख ९२हजार ५००रु च्या नोटा सिंधीकाॅलनीतील एका हाॅटेलमधे पकडल्या. या प्रकरणी दोन महिला आणि दोन पुरुषांवर जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हे शाखेने या प्रकरणात चौघांना गजाआड केल्याचे प्रभारी सहाय्यक पोलिस आयुक्त अनिल गायकवाड यांनी प्रसिध्द केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्रेसनोट नुसार या प्रकरणी प्रियंका सुभाष छाजेड(३०) रा.चिकलठाणा, नम्रता योगेश उघडे(४०) धंदा ब्रोकर रा. देवानगरी, मुश्ताक जमशिद पठाण(५३) रा.टाईम्स काॅलनी, हशीमखान बशीरखान(४४) रा.लक्ष्मणचावडी असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींचे नाव आहेत. वरील आरोपीपैकी दोघे जण मंगळवारी सकाळपासुन बाद झालेल्या चलनातील नोटा टेंपोमधे घेऊन फिरत असल्याची माहिती शहरातील एका पोलिस ठाण्याला खबर्याने दिली होती. पण त्यांनी ही कारवाई करण्याचे टाळले होते. पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, पोलिस उपायुक्त मिना मकवाना , प्रभारी सहाय्यक पोलिस आयुक्त अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज शिंदे, पोलिस कर्मचारी भगवान शिलोटे, विलास वाघ, विशाल पाटील, आनंद वाहुळ, नितीन देशमुख यांनी पार पाडली.