AurangabadCoronaNewsUpdate : जिल्हाप्रशासनात समन्वयाच्या अभावामुळे शहरात कोरोनाचे थैमान, खंडपीठाने ओढले ताशेरे

औरंगाबाद – समन्वयाचा अभाव असल्यामुळे शहरात पुन्हा कोरोनाचा उद्रेक वाढतो.याचे भान प्रशासनाने ठेवावे असे ताशेरे जस्टीस टी,व्ही. नलावडे आणि जस्टीस श्रीकांत कुलकर्णी यांच्या खंडपीठाने ओढले. कोरोना संदर्भात गेल्या दोन दिवसात प्रसिध्द होत असलेल्या बातम्यांची गंभीर दखल घेत या प्रकरणी एक सुमोटो याचिका दाखल करुन घेतली.या प्रकरणात अॅड.राजेंद्र देशमुख यांना कामकाज करण्याचे आदेश दिले होते.
या निरीक्षणात खंडपीठाने म्हटले आहेकी, पोलिसआयुक्त चिरंजीवप्रसाद विभागिय आयुक्त सुनिल केंद्रेकर,महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेआणि जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या मधे सुसंवाद नाही त्यामुळे शहरातील परिस्थिती गंभीर झाली आहे.धारावी सारख्या झोपडपट्टी मधे प्रशासनाने गांभिर्याने लक्ष देत कोरोना प्रादुर्भाव होण्यावर नियंत्रण मिळवले तसे औरंगाबाद प्रशासनाला का करता आले नाही.आता महापालिका आयुक्त म्हणतात आम्ही केरळा पॅटर्न राबवतो.या पूर्वी असा विचार प्रशासनाला का करता आला नाही.असेही खंडपीठाने म्हटले आहे.त्याच प्रमाणे क्वारंटाईन सेंटर मधे रुग्णांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जाते.क्वारंटाईन सेंटर मधील अनागोंदींचे सी.सी.टि.व्ही. फुटेज जिल्हाप्रशासनाने कोर्टाला सादर करावे व जपूनही ठेवावे.
गेल्या ४ महिन्यात जिल्हाप्रशासनाने कोरोना आटोक्यात आणण्यासाठी कोणती पावले उचलली याचीही माहिती खंडपीठाला सादर करावी असे आदेशात म्हटले आहे.महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेही नियमांचे पालन करत नाहीत तसेच खाजगी रुग्णालये जर नियमांचे पालन करंत नसतील तर त्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे खंडपीठाने आदेशात म्हटले आहे.त्याच प्रमाणे सरकारी कर्मचारी कामात कुचराई करतांना आढळले तर त्यांच्यावरही कारवाई होणे गरजेचे आहे.असे शेवटी खंडपीठाने म्हटले आहे.