Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaChinDisputeUpdate : भारत -चीन दरम्यानच्या करारामुळे भारतीय सैनिकांकाकडून शस्त्रांचा वापर नाही : जय शंकर

Spread the love

काँग्रेसनेते  राहुल गांधी यांनी सरकारला गलवान खोऱ्यात भारतीय जवानांना निशसत्र पाठवण्यावरून विचारलेल्या प्रश्नाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस, जयशंकर यांनी उत्तर दिले आहे. १५ जूनला गलवानमध्ये जवानांकडे हत्यारे होती. ही हिंसक मारामारी झाली त्यावेळी हत्यारांचा उपयोग करायचा नाही, दोन्हीकडील पक्षांमध्ये ठरलेले होते, असे उत्तर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दिले आहे. सन १९९६ आणि २००५ मध्ये दोन्ही देशांदरम्यान झालेल्या करारानुसार हत्यारांचा उपयोग करायचा नाही हे ठरले होते, असेही जयशंकर म्हणाले. सीमेवर तैनात असलेल्या जवानांकडे नेहमीत हत्यारे असतात. ते जेव्हा आपली चौकी सोडतात तेव्हाही त्यांच्या हातात हत्यारे असतात, असेही ते राहुल गांधी आणि विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना म्हणाले.

एका ट्विटद्वारे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी राहुल गांधींना उत्तर दिले आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘जे सत्य आहे ते व्यवस्थित समजून घेण्याची गरज आहे. सीमेवर जेवढे सैनिक तैनात असतात, त्या सर्वांकडे शस्त्रे असतात, विशेषत: चौकीवरून निघताना. १५ जून या दिवशी गलवान खोऱ्यात तैनात असलेल्या सर्वच सैनिकांकडे हत्यारे होती.’ चीनी सैनिकांसोबत झालेल्या हिंसक हाणामारीच्या वेळी हत्यारांचा उपयोग का केला गेला नाही हे या ट्विटद्वारे परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. शस्त्रसंधीच्या वेळी हत्यारांचा उपयोग न करण्याची दीर्घ (सन १९६६ आणि २००५ चे करार) परंपरा असल्याचेही ते म्हणाले.

दरम्यान चीनने निशस्त्र भारतीय जवानांची हत्या करून एक फार मोठा अपराध केला आहे. या वीरांना कोणतीही हत्यारे न घेता धोका असलेल्या ठिकाणी कोणी पाठवले आणि का पाठवले?, याला कोण जबाबदार आहे, असे मी विचारू इच्छितो, असे राहुल गांधी यांनी या व्हिडिओत म्हटले आहे. आपले प्रश्न विचारताना काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या दोन्ही वाक्यांमध्ये निशस्त्र या शब्दावर विशेष जोर दिला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!