AurangabadCrimeUpdate : महिला पोलिस अधिकार्याशी उध्दट वर्तन, एकास अटक

औरंगाबाद – बुध्द लेणीत अश्लील चाळे करणार्या इसमाला जाब विचारणार्या दामिनी पथकातील पोलिस अधिकार्याशी उध्दट वर्तन केल्या प्रकरणी बेगमपुरा पोलिसांनी अटक केली. मौ.अलतास खालेद अलतास (३३) रा.जसवंतपुरा बायजीपुरा असे अटक आरोपीचे नाव आहे.
आज सकाळी १०.३०च्या सुमारास बुध्द लेणी क्रं ७च्या खाली एक इसम महिले सोबत अश्लील चाळे करंत असल्याचे तेथील पहारेकर्यांनी गस्तीवरील दामिनी पथकाला सांगितले पथकाच्या प्रमुख पीएसआय वर्षा आजले यांनी घटनास्थळी जात आरोपी ला त्याच्या वर्तनाबद्दल जाब विचारताच चिडलेल्या आरोपीने पीएसआय आजले यांच्याशी उध्दट वर्तन केले. दरम्यान आजले यांनी या घटनेची माहिती नियंत्रण कक्षाला देताच बेगमपुरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मो. अलतासला ताब्यात घेत अटक केली. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली बेगमपुरा पोालिस करंत आहेत