AurangabadCrime : तलाठ्याचा मोबाईल हिसकावून पळणारा तत्परतेने अटक

औरंगाबाद – मोबाईलवर बोलंत असणार्या तलाठ्याच्या हातातून मोबाईल घेऊन पळणार्या भामट्याला गस्तीवरील वेदांतनगर पोलिसांनी तत्परतेने पकडून मोबाईल जप्त करंत अटक केली.
जालनारोडवरील बाबा पेट्रोलपंप परिसरात आज (मंगळवार) संध्याकाळी साडेसहा वा तलाठी विश्र्वास गांगुर्डे(३३) हेपायी जात असतांनाआरोपी शेख सिराज शेख नवाज(२२) रा.सादातमगर याने हिसकावून पळ काढला.त्राच वेळेस गस्तीवरील वेदांतनगर पोलिसांनी पाठलाग करुन शेख सिराज ला पकडले.
या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक रामेश्वर रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय शंकर डुकरे करंत आहेत