AurangabadCrimeUpdate : जेसीबीची परस्पर विक्री, अंबाजोगाईतून जप्त, आरोपींना नोटीस देऊन सोडले

औरंगाबाद – चिकलठाण्यातील जेसीबी किरायाने घेत परस्पर विक्री व खरेदी करणार्या दोन्ही भामट्यांना पुंडलिकनगर पोलिसांनी नोटीस देऊन सोडले व कोर्टात तारखेला हजर राहण्याचे फर्मान बजावले.
चिकलठाण्यातील संभाजी तळेकर यांचा जेसीबी किरायाने देण्याचा व्यवसाय आहे. तळेकर यांचा मित्र दिलीप राठोड याच्या ओळखीने अहमदनगर येथील भिंगार परिसरात राहणार्या किशोर लखन यास ७५ हजार रु.महिना किरायाने दिले.याचे दस्तऐवज पुंडलिकनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत खंडपीठाजवळ तयार केले. १आॅगस्ट २०१९ पासून लखन ने काही महिने किराया रितसर तळेकरांना दिला.पण एक वर्षापासून किराया देत नसल्यामुळे शेवटी कंटाळून मे २०२० मधे तळेकरांनी लखन च्या विरोधात पुंडलिकनगर पोलिसांना फिर्याद दिली. दरम्यान तळेकरांचा जेसीबी अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर ला एका शेतात लपवलेला पुंडलिकनगर पोलिसांना आढळला. या प्रकरणातील दुसरा आरोपी प्रमोद शंकर लहाणे याने जेसीबी २६ लाख रु.ना खरेदी करुन लपवला होता.पोलिस कर्मचारी विष्णू मुंढे आणि धर्मराज जाधव यांनी लपवलेला जेसीबी १५ जून रोजी शोधून जप्त केला.वरील कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक घन्नशाम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी रमेश सांगळे व गुन्हेप्रकटीकरण शाखेने पार पाडली.