AurangabadCrime : अखेर मुंडके सापडलेल्या “त्या” नवजात बाळाचे खुनी अटकेत

औरंगाबाद – गेल्या एप्रिल महिन्यात राजाबाजार परिसरात कवटीच्या वाड्या शेजारी सफाई कामगारांना एका लहानग्याचे रक्ताने माखलेले मुंडके सापडले होते. या प्रकरणी सिटीचौक धावणी मोहल्यातून पोलिसांनी दोन महिला व दोन पुरुषांना अटक केली. सिटीचौक पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता
पोलिस उपनिरीक्षक अमरनाथ नागरे आणि सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक हरिष खटावकर यांना खबर्याने माहिती दिल्या नंतर गिता नंद(३४) हरिष पालीवाल (३८) रतनलाल चौधरी (७५) व गंगा चौधरी (७०) अशा चौघांना धावणी मोहल्यातून ताब्यात घेत चौकशी केली वरील आरोपींपैकी हरिष पालिवाल आणि गिता नंद यांच्या अनैतिक संबंधातून एक मुल झाले होते. पण आरोपींना पश्र्चाताप झाल्यामुळे अर्भकाची विल्हेवाट लावली होती. वरील कारवाई पोलिस उपायुक्त निकेश खाटमोडे आणि पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सिटीचौक पोलिसांनी पार पाडली.