AurangabadNewsUpdate : मित्राचा अश्लील व्हिडीओ तयार करुन खंडणी मागणारा अटक

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद – मित्राचा त्याच्या घरातील अश्लील व्हिडीओ तयार करुन सोशल मिडीआवर टाकण्याची धमकी देत ३ हजार ५०० रु.खंडणी मागणार्‍या मजुराला मुकुंदवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. मुकेश उत्तम पुरी(४३) रा.मुर्तीजापूर म्हाडा काॅलनी असे अटक आरोपीचे नाव आहे. पुरी याने त्याचा मित्र भाउलाल गणबास (४३) रा.मुकुंदवाडी याचा अश्लील व्हिडीओ तयार केला हौता.व तो सोशल मिडीआवर टाकण्याची धमकी देत खंडणी मागत होता.अशी तक्रार गणबास यांनी मुकुंदवाडी पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी तक्रारीची खातरजमा करत पुरीला अटक केली.या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक शरद इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुकुंदवाडी पोलिस करंत आहेत.

Advertisements

गुन्हेशाखा आणि सिडको औद्योगिक पोलिसांकडून दोन मोबाईल चोरटे अटक

Advertisements
Advertisements

गुन्हेशाखेने रेकाॅर्डवरील चोरटा अक्षय रमेश वाहूळ रा. सातारा परिसर याने चोरीचा मोबाईल विक्री केलेल्या इसमाला गुन्हेशाखेने पकडून चौकशी केली असताया प्रकरणात अक्षय वाहूळ दोषी आढळला.गुन्हेशाखेने त्याला अटक केली.या कारवाईत पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा पोलिस तपास करंत आहेत.तर दुसर्‍या एका घटनेत सिडको औद्योगिक पोलिसांनी एका विधी संघर्ष ग्रस्त बालकाकडून चोरीस गेलेला १५हजार रु.चा मोबाईल जप्त केला.या प्रकरणी २८मे रोजी गुन्हा दाखल झालेला आहे.पीढील तपास पोलिस निरीक्षक विठ्ठल पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय पूर्णपात्रे तपास करंत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!