तृतीयपंथी यांनी दिला निलेश राणे यांना कडक इशारा

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र माजी खासदार निलेश राणे यांनी सध्या सोशल मीडियावर खालच्या पातळीवरच जाऊन विरोधकांवर टीकांचा सपाटा लावला आहे. दरम्यान त्यांनी त्यांच्या एका ट्वीटमध्ये राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना चक्क ‘हिजडा’ असा उल्लेख केला. यावरुन तृतीयपंथीय असलेल्या सारंग पुणेकर यांनी निलेश राणे यांना चांगलेच खडसावले आहे.
कोणतरी हिजडा राज्यमंत्री आहे तनपुरे नावाचा ज्याला माझा कार्यक्रम करायचा आहे. असे कार्यक्रम करणारे आम्ही खूप बघितले… समोर आले की पिवळी होते साल्यांची. जागा सांग तनपूरे, येतो मी.
— Nilesh N Rane (Modi ka Parivaar) (@meNeeleshNRane) May 19, 2020
गेल्या काही दिवसांपासून निलेश राणे ट्विटरवर, विरोधकांवर कडाडून टीका करतांना दिसत आहेत. दरम्यान निलेश राणे यांनी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली. इतकेच नाही तर त्यांना ‘हिजडा’ असे संबोधले, त्यामुळे सारंग पुणेकर चांगल्याच संतापल्या आहेत. सारंग पुणेकर यांनी निलेश राणे यांच्या ट्वीटला उत्तर देत म्हटले आहे की, “जर हिजडा शब्दाचा अर्थ माहीत नसेल, इतिहास माहीत नसेल तर मी सांगते पण आपली बालिश बुद्धी जगाला दाखवू नका, जेंव्हा नाकात वेसण नसलेलं हलगट सैरावैरा पळत ना तशीच काही तुमची गत झालीये, तोंडाला आळा घाला हिजडा शब्द काढा नाहीतर योग्य तिथे बाजार उठवला जाईल” असा इशारा सारंग पुणेकर यांनी निलेश राणे यांना दिला आहे.
जर हिजडा शब्दाचा अर्थ माहीत नसेल इतिहास माहीत नसेल तर मी सांगते पण आपली बालिश बुद्धी जगाला दाखवू नका, जेंव्हा नाकात वेसण नसलेलं हलगट सैरावैरा पळत ना तशीच काही तुमची गत झालीये, तोंडाला आळा घाला हिजडा शब्द काढा नाहीतर योग्य तिथे बाजार उठवला जाईल@meNeeleshNRane @doke_snehal pic.twitter.com/oQCe7KsZLH
— Sarang Punekar (@sarang_punekar) May 19, 2020