#CoronaVirusUpdate : जाणून घ्या देशात , जगात किती आहे ? या क्षणाला कोरोनाबाधितांची संख्या … फक्त एका क्लिकवर….

देशभरात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात यावा म्हणून अनेक उपाययोजना केल्या जात असल्या तरी कोविड १९ मुळे जीव गमावणाऱ्यांचा आकडा तीन हजारांहून पुढे गेलाय. भारतातील करोनाबाधितांची संख्या १ लाख १ हजार १३९ वर पोहचलीय. यातील ३ हजार १६३ जणांचा मृत्यू झालाय तर ३९ हजार १७४ जणांनी या आजारावर मात केलीय. देशात ५८ हजार ८०२ जणांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याला सोमवारी सुरुवात झाली आणि देशातील करोना रुग्णांची संख्या १ लाखावर गेली. अनेक राज्यांनी लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात सूट दिली आहे. यामुळे देशात करोना रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त होतेय. आज सकाळी ८ वाजता देशाच्या आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारी नुसार
दुनिया : रुग्णांची एकूण संख्या : ४८९४०७१ । एकूण मृत्यूंची संख्या : ३२०१८१ (१४ %) । उपचारानंतर बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या : १९०७९९२ ( ८६ %)
भारत : रुग्णांची एकूण संख्या : १,०१,१३९ । एकूण मृत्यूंची संख्या : ३१६३ (७%) । उपचारानंतर बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या : ३९२३३ (९३%)
महाराष्ट्र : रुग्णांची एकूण संख्या : ३५०५८ । एकूण मृत्यूंची संख्या : १२४९ । उपचारानंतर बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या : ८४३७
देशभरात सोमवारी करोनाचे सर्वाधिक ५२४२ इतके नवे रुग्ण आढळून आले. देशातील करोना रुग्णांची संख्या सोमवारी सकाळी ९६,१६९ इतकी होती. त्यात ३०२९ जणांचा मृत्यू तर ३६८२४ जण करोनामुक्त झाले होते. तर ५६३१६ जणांवर सध्या उपचार सुरू असल्याचं सांगण्यात आलं. मात्र दिवस संपेपर्यंत भारताने करोना रुग्णांचा १ लाखाचा आकडा ओलांडला आहे. सर्वाधिक करोना रुग्ण आढळणाऱ्या देशांच्या यादीत भारत ११ व्या क्रमांकावर आहे.
जगातील रुग्णसंख्या ५० लाखांच्या जवळपास
जागातील करोना रुग्णांची संख्या ५० लाखांजवळ पोहोचली आहे. यापैकी ३२०१८१ जणांचा मृत्यू झाला आहे. जगात सर्वाधिक कोरोना रुग्ण १,५५०२९४ हे अमेरिकेत आहेत. त्यापैकी ९१ हजार ९८१ नागरिकांचा करोनाने मृत्यू झाला आहे. यात दुसऱ्या क्रमांकावर रशिया आहे. तिथे २ लाख ९० हजार ६७८ करोनाचे रुग्ण आहे. त्यापैकी २७२२ जणांचा मृत्यू झाला आहे. रशियात करोनाचे रुग्ण वेगाने वाढत असले तरी इतर देशांच्या तुलनेत तेथील मृत्यूदर हा अतिशय कमी आहे. यात तिसऱ्या क्रमांकावर आहे स्पेन. स्पेनमध्ये २७७७१९ जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यापैकी २७६५० जणांचा मृत्यू झाला आहे. ब्रिटन चौथ्या क्रमांकावर आहे. ब्रिटनमध्ये २४६४०६ इतके रुग्ण आहेत. तर पाचव्या क्रमांकावर ब्राझील, सहाव्या क्रमांकावर इटली, फ्रान्स सातव्या क्रमांकावर, जर्मनी आठव्या, तुर्की नवव्या तर इराण दहाव्या क्रमांकावर आहे तर भारताचा क्रमांक जगात ११ वा आहे.