Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusEffect : मेरे देश मे… पीपीई किट आणि एन 95 मास्कची मागणी करणाऱ्या डॉक्टरवर अशी झाली कारवाई !!

Advertisements
Advertisements
Spread the love

आंध्र प्रदेशात विशाखापट्टणम येथे  कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरने पीपीई किट आणि एन 95 मास्कची मागणी केल्यानंतर त्याच्यावर निलंबनाची कारवाई केल्यानंतर विशाखापट्टणम इथं सरकारविरोधात कपडे काढून आंदोलन करणाऱ्या डॉक्टरला पोलिसांनी हात बांधून पोलीस ठाण्यात नेलं. या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलं आहे. नर्सिपटनम इथं सरकारी रुग्णालयात कोरोना रुग्णांच्या उपचारावेळी डॉक्टरांनी सरकारकडे पीपीई कीट आणि एन 95 मास्कची मागणी केली होती. याबाबत डॉ. सुधाकर यांनी माध्यमांनासुद्धा माहिती दिली होती. माध्यमांना माहिती दिल्यानंतर डॉ. सुधाकर यांना तात्काळ निलंबित कऱण्यात आले. त्यानंतर सुधाकर यांचे मानसिक संतुलन बिघडलं असल्याचा दावाही करण्यात येत आहे.

Advertisements

या अवमानास्पद कारवाईमुळे व्यथित होऊन डॉ. सुधाकर यांनी शनिवारी त्यांची कार अचानक रस्त्याकडेला लावली आणि शर्ट काढला. त्यानंतर उघड्या शरीरासह त्यांनी रस्त्याच्या मधोमध झोपून  शासनाचा विरोध करण्यास सुरुवात केली. त्यांनी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्याविरोधात वक्तव्य केले. घटनास्थळी पोलीस पोहोचल्यानंतर सुधाकर यांना समजावण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पोलिसांच्या माहितीनुसार ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. शेवटी त्यांचे हात बाधून रिक्षात बसवून पोलिस स्टेशनला नेण्यात आलं. त्यांची कार जप्त करण्यात आली असून सुधाकर हे नशेत होते असेही सांगण्यात येत आहे. दरम्यान, सध्या कोरोनाच्या काळात देवदूत ठरलेले डॉक्टर आणि लोकांचे संरक्षण करणारे पोलीस यांच्या या कृत्यामुळे नागरिकांना धक्का बसला आहे. डॉक्टरांनी विरोधासाठी अवलंबलेला मार्ग आणि त्यांच्यावर कारवाई करताना पोलिसांनी दिलेली वागणूक कोड्यात टाकणारी आहे. डॉक्टरांचा विरोध आणि पोलिसांच्या कारवाईमुळे राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. माजी मंत्री देवीननी उमा यांनी म्हटलं की, इतक्या मोठ्या शहरातील सरकारी रुग्णालयाती वरिष्ठ डॉक्टरांनी आवश्यक साधनांची मागणी केली तेव्हा त्यांचे निलंबन केले. ते रस्त्यावर विरोध करण्यासाठी उतरले तेव्हा सरकारच्या आदेशानंतर पोलिसांनी त्यांचे हात बांधून नेलं. एका वरिष्ठ डॉक्टरसोबत असं वर्तन दुर्दैवी आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!