Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusEffect : जाणून घ्या लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याचे काय आहेत नवे नियम ?

Spread the love

राज्य सरकारने आज कोव्हिड-19 च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन 4.0 लागू केल्यानंतर  सायंकाळी गृह मंत्रालयाने लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. कोरोना विषाणूमुळे देशव्यापी लॉकडाउनचा चौथा टप्पा सोमवारपासून सुरू होत आहे . या लॉकडाऊन नुसार लोकांना मागील लॉक डाऊनपेक्षा अधिक सवलत आणि सूट मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात असताना केंद्र सरकारने जारी केलेल्या तत्त्वांमध्ये मेट्रो, विमान सेवा बंद राहणार असल्याचं म्हटले  आहे. त्याचबरोबर शाळा, कॉलेज शॉपिंग मॉल्स, धार्मिक स्थळं, धार्मिक कार्यक्रम, हॉटेल्स आणि सिनेमाहॉल त्याचबरोबर जीम देखील बंदच राहणार आहे. तर रेड झोन, ग्रीन झोन आणि ऑरेंज झोन संदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारांना देण्यात आले आहेत. राज्य सरकार आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या गाईडलाईननुसार झोनचा निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

देशाच्या  नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथोरिटी (NDMA) कडून याबाबत परिपत्रक जारी करण्यात आले होते. त्यानुसार भारत सरकारअंतर्गत येणाऱ्या विविध विभाग आणि राज्य सरकारांना लॉकडाऊनची नियमावली 31 मेपर्यंत सुरू ठेवण्याचे निर्देश दिले. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली होती. ते म्हणाले की, हा टप्पा आतापर्यंतच्या तीन लॉकडाऊनपेक्षा पूर्णपणे वेगळा आणि अधिक सवलतींचा असेल. त्याअंतर्गत, आज गृह मंत्रालयाकडून मार्गदर्शक तत्त्वं जारी करण्यात आली. महाराष्ट्र (Maharashtra) सरकारनेही लॉकडाऊन कालावधी 31 मे पर्यंत वाढवला आहे. राज्य सरकारने 17 मे रोजी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत. केंद्र शासनाने आपत्ती अधिनियम 2005 अंतर्गत लॉकडाऊन कालावधी 17 मेपर्यंत वाढवला होता. हा कालावधी आज संपला असून आता पुढे लॉकडाऊनचा चौथा टप्पा लागू करण्यात आला आहे.

दरम्यान कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता केंद्राच्या आदेशापूर्वीच लॉकडाऊनबाबत उद्धव ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महाराष्ट्रात 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला  आहे. कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे. याआधी सलग तीन वेळा लॉकडाऊन वाढवण्यात आला होता. महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात कोरोना बाधितांचा आकडा 30 हजारांवर पोहोचला आहे. त्यामुळे सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनचा तिसरा टप्पा आज (17 मे) संपत आहे. उद्यापासून लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु होणार आहे.

राज्य सरकारचे आदेश काय आहेत ?

राज्य सरकारने या टप्प्यात  अधिक अटी शिथिल करण्याची तयारी केली असली तरी कोणतेही शासकीय कार्यालय जर प्रतिबंधित क्षेत्रात येत असतील तर ते बंद राहील , अशा स्वरूपाचे आदेश राज्याचे मुख्य सचिव अजय मेहता यांनी काढले आहेत. करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात घोषित केलेल्या लॉकडाऊनचा चौथा टप्पा उद्यापासून सुरू होतो आहे . हा लॉकडाऊन ३१ मेपर्यंत असेल, अशी माहिती राज्य आणि केंद्र सरकारने दिली आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करताना लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याची घोषणा केली होती. त्यांनतर लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय कॅबिनेट राजीव गौबा यांनी  रात्री ९ वाजता राज्यांच्या मुख्य सचिवांसोबत बैठक घेऊन या बैठकीनंतर लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यासाठी नवीन दिशानिर्देश किंवा नियमावली जारी करण्यात आली आहे. यामध्ये पुढील निर्णयांचा समावेश आहे.

१.  रेल्वे, मेट्रो, विमान सेवा, शाळा, कॉलेज, मॉल आणि चित्रपटगृह बंदच राहणार. यासोबतच हॉटेल्स आणि रेस्टॉरंटही बंद राहतील.

२. सांस्कृतिक, कुठल्याही सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांवरील बंदी कायम राहणार आहे.

३. कंटेन्मेंट झोनमध्ये फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार. नागरिकांना बाहेर येण्या-जाण्याची सूट नाही.

४.  राज्यांना रेड, ग्रीन, ऑरेंज झोन आता ठरवता येणार. झोन ठरवण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांना घेता येईल.

५. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि स्टेडियम सुरू करण्यास परवानगी. पण मैदानं आणि स्टेडियममध्ये प्रेक्षकांना परवानगी नाही.

६.  रेड झोन, कंटेन्मेंट झोन वगळता राज्यांना एकमेकांच्या अनुमतीने आंतरराज्य सेवा सुरू करू करता येणार

७. अत्यावश्यक सेवा वगळता सकाळी ७ आणि संध्याकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी राहणार

८.  सरकारी कार्यालयं आणि तेथील कँन्टीनही सुरू होणार

९. ई-कॉमर्स कंपन्यांना रेड झोनमध्येही जीवनावश्यक नसलेल्या वस्तूंच्या पुरवठा करता येणार, सरकारने बंदी उठवली

आपलं सरकार

Click to listen highlighted text!