लॉकडाऊनच्या काळात सख्ख्या चुलत भावाकडून अल्पवयीन बहिणीवर बलात्कार…

एकीकडे राज्यात कोरोनाचा उद्रेक चालू असताना जालना शहरात सख्ख्या चुलत भावाने बहिणीवरच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लॉकडाऊन असतानाही अल्पवयीन तरुणीवर बलात्कार झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. यामुळे भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्यालाच या नराधमाने काळिमा फसल्याचे तपासात उघडकीस आलं आहे. जालना शहरातील दर्गावेश परिसरात ही घटना घडली आहे. सदर बाजार पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जालना शहरातील दर्गावेश परिसरात राहणाऱ्या अमोल ढवळे या 20 वर्षीय नराधमानं आपल्याच 12 वर्षीय सख्ख्या चुलत बहिणीवर तिच्याच खोलीत जाऊन लैंगिक अत्याचार केला. ही घटना घडलेल्यानंतर पीडित तरुणीने प्रकरणाची माहिती आईला सांगितली. त्यांनतर आईने तात्काळ पोलिसांत धाव घेत घटनेची माहिती दिली. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं. आणि पीडितेला उपचारासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.