#CoronaVirusEffect : कोरोना बळी ठरलेल्या “या” तरुण पोलीस अधिकाऱ्याची हि पोस्ट वाचा तुमच्याही डोळ्यात पाणी येईल…..

खरंच दिलं आयुष्य,
भान नाही परिवाराचं…
आनंद, सुख याचाच त्याग करुन
पालन केलं कर्तव्याचं.
कर्तव्य करताना प्राणाचे बलिदान देऊन मुंबईच्या सुरक्षेसाठी आपण केलेल्या त्यागासाठी मुंबई पोलीस दलातील प्रत्येक जवान आपल्याला आयुष्यभर स्मरणात ठेवेल…— मुंबई पोलीस – Mumbai Police (@MumbaiPolice) May 16, 2020
अमोल कुलकर्णी , एपीआय मुंबई पोलीस , यांनी २ एप्रिलला आपल्या ट्विटर हॅण्डलवरून पोस्ट टाकली कि , कोणी ५ कोटी देतोय तर कोणी ५०० कोटी देतो पण आम्ही आमचा आयुष्य देतोय …. आणि आज हि पोस्ट खरी ठरली एका तरुण अधिकाऱ्याने लोकांना कोरोनापासून वाचवता वाचवता स्वतःचे आयुष्य दिले . मुंबई पोलीस दलाने अमोल कुलकर्णी यांना भावपूर्ण आदरांजली देताना हि पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे कि ,
“खरंच दिलं आयुष्य,
भान नाही परिवाराचं…
आनंद, सुख याचाच त्याग करुन
पालन केलं कर्तव्याचं…”
कर्तव्य करताना प्राणाचे बलिदान देऊन मुंबईच्या सुरक्षेसाठी आपण केलेल्या त्यागासाठी मुंबई पोलीस दलातील प्रत्येक जवान आपल्याला आयुष्यभर स्मरणात ठेवेल…
Mumbai: Maharashtra Home minister Anil Deshmukh visited Shahu Nagar Police Station in Dharavi today and met the Police personnel there. He also paid tribute to API Amol Kulkarni, who was posted at this police station and died due to #COVID19. pic.twitter.com/Q4vSiZsv61
— ANI (@ANI) May 16, 2020
राज्यात दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि पोलीस आपल्या जीवाची बाजी लावून कर्तृव्य बजावत आहे. परंतु, कोरोनामुळे मुंबईत आणखी एका तरुण पोलीस निरीक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शाहूनगर पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल हनुमंत कुलकर्णी (वय 32) हे ताप व सर्दी यामुळे आजारी होते. त्यामुळे कुलकर्णी यांनी रुग्णनिवेदन केले होते आणि घरीच राहण्यासाठी अर्ज केला होता. कोरोनाची चिंताजनक परिस्थितीत असल्यामुळे अमोल हनुमंत कुलकर्णी यांनी सायन रुग्णालयात जाऊन 13 मे रोजी कोरोनाची चाचणी केली होती. आज 3 दिवसानंतर त्यांच्या रिपोर्ट प्राप्त झाला. त्यात हनुमंत कुलकर्णी यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. परंतु, आज पहाटे 5 वाजेच्या सुमारास कुलकर्णी हे आपल्या राहत्या घरातील बाथरूममध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आले होते. त्यांना तातडीने सायन रुग्णालय इथं उपचारासाठी नेण्यात आले परंतु, रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी कुलकर्णी यांना तपासून मयत घोषित केलं, अशी माहिती शाहूनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास गंगावणे यांनी दिली. तसंच, हनुमंत कुलकर्णी यांच्या मृत्यूबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केलं.
We regret the loss of API Amol Kulkarni from Mumbai. Shri Kulkarni was tested after developing symptoms. Reports confirmed today morning that he was COVID positive. May his soul rest in peace.
DGP and all ranks of Maharashtra Police offer their condolences to his family.
— महाराष्ट्र पोलीस – Maharashtra Police (@DGPMaharashtra) May 16, 2020
राज्यात आतापर्यंत 1 हजार 140 पोलीस कोरोनाबाधित
दरम्यान, काल 15 मे रोजी मुंबई पोलीस दलातील आणखी एका कर्मचाऱ्याचा (मुंबई पोलीस ) कोरोनामुळे बळी गेला. शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक भगवान पार्टे यांची कोरोनाविरुद्धची झुंज अपयशी ठरली. 45 व्या वर्षी एमजीएम रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 15 मेपर्यंत राज्यात कोरोनामुले 10 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. तर राज्यात गेल्या 24 तासात 79 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या या संख्येमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. त्यामुळे 55 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या पोलिसांना घरी राहण्याच्या सूचना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देण्यात आला आहेत. मुंबई पोलीस दलात आतापर्यंत जवळपास 600 च्या आसपास पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर राज्यात आतापर्यंत 1 हजार 140 पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून त्यामध्ये 112 पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. तर या आजारात 9 पोलिसांनी आपला जीवही गमावला आहे.