#CoronaVirusUpdate : Aurangabad : जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 842, जाणून घ्या कुठे झाली आज 93 रुग्णांची वाढ

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज 93 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. आज जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 842 झाली, असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. एन सहा,सिडको (2), बुढीलेन (1), रोशन गेट (2), संजय नगर (1), सादात नगर (1), भीमनगर, भावसिंगपुरा (2), वसुंधरा कॉलनी (1), वृंदावन कॉलनी (3), न्याय नगर (8), कैलास नगर (1), पुंडलिक नगर (8),सिल्क मील कॉलनी (7), हिमायत नगर (6), चाऊस कॉलनी (3), भवानी नगर (4), जुना मोंढा, भवानी नगर (1), रेहमानिया कॉलनी (4) हुसेन कॉलनी (19), प्रकाश नगर (1) शिव कॉलनी गल्ली नं. 5, पुंडलिक नगर (1), हुसेन कॉलनी, गल्ली नं. 5 (2), बायजीपुरा (7), हनुमान नगर (1), हुसेन नगर (1), अमर सोसायटी (1), न्यू हनुमान नगर, गल्ली नं.1, दुर्गा माता मंदिर (1), फुलशिवरा गंगापूर (2), बहादूरपुरा (1), रऊफ कॉलनी (1), या भागातील कोरोनाबाधित असल्याचेही त्यांनी कळविले आहे.
कन्टेंनमेंट झोनमध्ये गस्ती पथकाची नियुक्ती
औरंगाबाद: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून वेळोवेळी अत्यावश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. कंन्टेंनमेंट झोनमध्ये आता पोलिस प्रशासनाला मदत करण्यासाठी कंन्टेंनमेंट झोनमधील क्षेत्रात पायी गस्ती घालणाऱ्या (Foot Ptrolling) पथकांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. ज्ञानोबा बानापुरे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
शहरातील कंन्टेंनमेंट झोनमध्ये पोलिस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला असून कंन्टेंनमेंट झोनमधून नागकिरंाचे बाहेरील भागात तसेच बाहेरील भागातील नागरिकांचे कंन्टेंनमेंट झोनमध्ये होणाऱ्या आवगमन बंद करण्यासाठी या पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या पथकाने Community policing चे काम कारावे, नेमून दिलेल्या भागातील अधिकारी/ नागरिकांचा Whatsup Group तयार करून नागरिकांना कोरोनाचा संसर्ग टाळण्यासंबंधी सुचना/ मार्गदर्शन करावे, नेमून दिलेल्या संपूर्ण क्षेत्रात 5 ते 6 वेळेस पायी गस्त घालावी, नागरिकांमध्ये जनजागरण व समुपदेशन करावे, नागरिकांची गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी, एखादा संशयित आढळून आल्यास तात्काळ संबंधीत आरोग्य अधिका-यांच्या निदर्शनास आणून द्यावे, झोनमध्ये जिवनावश्यक वस्तू व सेवांचा पुरवठा व्यवस्थित होत असल्याबाबतची खात्री करावी, याबाबत काही समस्या उद्भवल्यास तात्काळ अपर तहसिलदार औरंगाबाद व अन्नधान्य वितरण अधिाकरी औरंगाबाद यांच्या मार्फत जिल्हा पुरवठा अधिाकरी यांच्याशी संपर्क करावा, अनावश्यकरित्या नागरिक एकत्र जमा होत असल्याचे दिसून आल्यास सदरील बाब संबंधित पोलिस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून द्यावी, झोनमध्ये काम करतसना योग्य ते सामाजिक अंतर पाळावे अशाप्रकारचे कार्य करणे आवश्यक असल्याचेही प्रसिध्दी पत्रकात कळविण्यात आले आहे.