#CoronaVirusEffect : काय बोलणार माहित नाही , पण पंतप्रधान आज राष्ट्राला उद्देशून भाषण करणार

Shri @narendramodi will be addressing the nation at 8 PM this evening.
— PMO India (@PMOIndia) May 12, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा आज रात्री ८ वाजता कोरोनाचे संकट आणि लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर देशातील जनतेशी संवाद साधणार आहेत. आपल्या संबोधनाद्वारे ते कोरोनाला रोखण्यासाठी सरकारकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजना आणि पुढील कृतीबाबत जनतेला माहिती देण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यावेळी ते लॉकडाउनबाबत महत्त्वाची घोषणा करतील अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे.तरीही ते काय बोलतील याचा अंदाज लावता येत नाही कारण देशाच्या भवितव्याबाबत निर्णय घेणारे ते स्वयंभू पंतप्रधान आहेत.
याबाबत पंतप्रधान कार्यालयाने ट्विट करून ही माहिती दिली आहे. आपल्या भाषणात ते आणखी नवा निर्णय घोषित करतील का, देशातील आर्थिक स्थितीला उभारी देण्यासाठी ते काही उपाय योजना सूचवतील का, किंवा काही ठिकाणी ते लॉकडाउन शिथील करतील का, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे पंतप्रधानांच्या संवादादरम्यान मिळण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने घोषित केलेला देशव्यापी लॉकडाउनचा तिसरा टप्पा येत्या रविवारी, १७ मे रोजी पूर्ण होत आहे. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना आणि लॉकडाउनबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. यावेळी अनेक मुख्यमंत्र्यांनी लॉकडाउन आणखी वाढवण्याची आवश्यकता असल्याचे मत मांडले आहे.