#CoronaVirusUpdate : महाराष्ट्रात १६ हजाराहून अधिक रुग्णसंख्या , जाणून घ्या आपल्या जिल्ह्यातील ताजी स्थिती…

34 deaths and 1233 new #COVID19 positive cases reported in Maharashtra today, taking the total number of cases in the state to 16,758; death toll stands at 651: State Health Department pic.twitter.com/SP93IDsu3A
— ANI (@ANI) May 6, 2020
राज्यात आज कोरोनामुळे ३४ रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या आता ६५१ वर पोहचली आहे. विशेष म्हणजे राज्यात आज एकाच दिवशी करोनाचे १२३३ नवीन रुग्ण आढळले असून आतापर्यंत २४ तासांतील रुग्णांचा हा सर्वाधिक आकडा आहे. राज्यातील करोनाबाधित रुग्णांचा एकूण आकडा आता १६ हजार ७५८ इतका झाला असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. दरम्यान करोना साथीने मुंबई, पुणे या महानगरांत रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली आहे. राज्यातील करोना साथीचा आजचा तपशील धोक्याची घंटा वाजवणारा आहे. आज राज्यात एकाच दिवशी करोनाचे १२३३ नवीन रुग्ण आढळून आले आहेत तर ३४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात आज 1233 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 16758 अशी झाली आहे. आज नवीन 275 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 3094 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.#CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak #मीचमाझारक्षक #मैंहीमेरारक्षक
— Rajesh Tope (@rajeshtope11) May 6, 2020
राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या १६ हजार ७५८ झाली आहे. राज्यात आज २७५ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३०९४ रुग्ण बरे झाले आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख ९० हजार ८७९ नमुन्यांपैकी १ लाख ७३ हजार ८३८ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १६ हजार ७५८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आज राज्यात ३४ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात मुंबईतील २५, पुण्यातील ३, अकोला शहरात ३, जळगाव शहरात १ तर सोलापूर शहरात एका रुग्णांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशमधील एका व्यक्तीचा मृत्यू मुंबईत झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी २१ पुरुष तर १३ महिला आहेत. त्यात ६० वर्षे किंवा त्यावरील १८ रुग्ण आहेत तर १३ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ३ जण ४० वर्षांखालील आहेत. ३४ रुग्णांपैकी २७ जणांमध्ये (७९ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.
सध्या राज्यात २ लाख ११ हजार ११२ लोक होम क्वारंटाइनमध्ये असून १३ हजार १०७ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या १०४८ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण ११ हजार ६९२ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ५१.१४ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे