Aurangabad NewsUpdate : बेकरीविरुद्ध अफवा पसरविणाऱ्याविरुद्ध गुन्हा

औरंंंगाबाद : छावणीतील एका बेकरीत काम करणाड्ढया दोन कामगारांना कोरोनाची लागण झाल्याची अफवा पसरविणाNया एका अज्ञाताविरुध्द सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २९ एप्रिल रोजी एकाने व्हॉटस्अॅप ग्रुपवर छावणीतील एका बेकरीत काम करणा-या दोन कामगारांना कोरोनाची लागण झाल्याचा मॅसेज व्हायरल केला होता. त्यामुळे जनसामान्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. त्यावर छावणी परिषदेने खुलासा केल्यानंतर प्रकरणावर पडदा पडला होता. तर अफवा पसरविणा-या त्या व्यक्तिवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी छावणी परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाNयांनी पोलिस आयुक्तांकडे केली होती. त्यावरुन सायबर पोलिस ठाण्यातील शिपाई शिल्पा तेलोरे यांच्या तक्रारीवरुन अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक गिता बागवडे करीत आहेत.