#AurangabadNewsUpdate : पोहोण्यासाठी मित्रासह गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा हर्सूल तलावात बुडून मृत्यू

औरंंंगाबाद : मित्रासह पोहण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मूलांचा हर्सूल तलावत बुडुन मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी (दि.३०) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली. मयत दोघेही पाचवी ते सातवीच्या वर्गात शिकत होते. या घटनेमुळे जहांगिर कॉलनीत शोककळा पसरली आहे.
हर्सूल जहांगिर कॉलनी मधील अरबाज अजिज शहा (वय १०) आणि सैयद रिहान सैयद अन्वर (वय १३) हे दोघे गुरूवारी दुपारी बाराच्या सुमारास त्यांचा मित्रासह हर्सूल तलावात पोहोण्यासाठी गेले होते. पोहोता येत नसल्याने दोघे गटांगळया खात तलावात बुडाले. दोघे बुडत असल्याचे पाहूुन सोबत असलेल्या मित्रांनी तेथुन पळ काढत घर गाठले. त्यांनी घटनेची माहिती घरच्यांना दिली.
नातेवाइकांनी तात्काळ तलावाजवळ धाव घेत मुलांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. नागरीकांनी घटनेची माहिती पोलीस मुख्यालयाला दिली. यावरून हर्सूल पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाला पाचारण कले. जवानांनी तलावात उडी मारून दोन्ही मुलांना बेशुध्दावस्थेत बाहेर काढुन पोलीसांच्या हवाली कले. हर्सूल ठाण्याचे जमादार सोन्ने यांच्या पथकाने दोघांना घाटीत दाखल कले असता डॉक्टरांनी तपासुन मृत घोषित कले. मयत मुलांचे वडिल मजुर कामगार आहे. या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.