#MaharashtraCoronaLatestUpdate : कोविड-१९ : जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील अपडेट माहिती एका क्लिकवर…

कोरोना बंदोबस्तामुळे कोरोना व्हायरसची लागण होऊन मृत्युमुखी पडलेल्या पोलिसांच्या कुटुंबियांना ५० लाखांची मदत करण्यात येत असून त्यांच्या कुटुंबियातील एका एकतीस नोकरी देण्यात येणार आहे.
राज्यातील करोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. आज दिवसभरात ४४० नवे रुग्ण सापडले असून, १९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण रुग्णसंख्या ८, ०६८ झाली आहे. तर आतापर्यंत ३४२ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत करोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढतोच आहे. आज, रविवारी दिवसभरात ३४ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळं एकूण करोनाबाधितांचा आकडा २७५वर गेला आहे. दुसरीकडे सलग दुसऱ्या दिवशी माहिम आणि दादरमध्ये एकही करोनाचा रुग्ण सापडला नाही.
आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशातील रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ होत असल्याची सकारात्मक माहिती दिली असली तरी महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंता वाढवणारी आहे. आज पुणे महापालिका क्षेत्रातील जळगाव येथे २, सोलापूर शहर आणि लातूर येथे प्रत्येकी एक रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आज राज्यात १९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात मुंबईतील १२, पुणे महापालिका क्षेत्रातील जळगाव येथे 2 , सोलापूर शहर आणि लातूर येथे प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे. आजपर्यंत १ लाख १६ हजार ३४५ रुग्णांची तपासणी केली असून त्यात एक लाख सात हजार ५१९ रुग्णांचे तपासणी रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर ८०६८ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. राज्यात सध्या ६०४ कंटेनमेंट झोन असून १६०३ सर्वेक्षण पथकं काम करत आहे.
राज्यात मुंबईत सर्वाधिक करोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. तर धारावीमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. आज, रविवारी दिवसभरात धारावीमध्ये ३४ नवे रुग्ण सापडले. त्यामुळं एकूण रुग्णांचा आकडा २७५वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत १४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज सापडलेल्या करोनाबाधितांमध्ये १९ पुरुष तर १५ महिला आहेत.