Aurngabad Crime : बीअर बार फोडणारे दोघे पोलिसांच्या जाळ्यात

औरंंंगाबाद : जालना रोडवरील ज्योर्तिमय कॉम्पलेक्स येथे असलेले देवदास बीअर बार फोडणा-या दोन चोरट्यांना सिडको पोलिसांनी अटक केली. दोघांच्या ताब्यातून पोलिसांनी १२ हजार ३५० रूपये किमतीच्या विदेशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. बीअर बार फोडणा-याचे तीन साथीदार फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
इम्रान अली रशीद अली (वय २०, रा.हुसेन कॉलनी, पुंडलिकनगर), शेख जाहेद शेख गनी (वय २१, रा.भारतनगर, पुंडलिकनगर) अशी पोलिसांनी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. अटकेत असलेल्या दोघांनी आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने २४ एप्रिलच्या पहाटे देवदास बीअर बार फोडून जवळपास १ लाख ४३ हजाराची विदेशी दारू लंपास केली होती. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसअाय बाळासाहेब आहेर करंत आहेत.