#AurangabadUpdate : औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातील व्यापारी आणि नागरिकांसाठी महत्वाची माहिती….

कोरोना व्हायरसच्या पार्शवभूमीवर औरंगाबाद शहरात पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी या पूर्वीच आदेशित केल्याप्रमाणे उद्या दि. २४ च्या दुपारी १३.०० ते रात्री २३.०० वाजेपर्यंत कलम १४४ अंतर्गत कडक कर्फ्यूचे आयोजन केलेले असून याच धर्तीवर विशेष मोहीम म्हणून औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनीही उद्या दि. २४ रोजी सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात वैद्यकीय , आरोग्य सेवा वगळता सर्व व्यवस्थापन बंद राहणार आहेत. शहरात आणि ग्रामीण भागात विनाकारण फिरणाराना आळा बसावा यासाठी हि विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या व्यक्ती व संस्थांसाठी पासेससाठी लिंक…
ज्या लोकांना अत्यंत महत्त्वाच्या कारणांसाठी (तातडीची वैद्यकीय गरज, अत्यावश्यक सेवा) या कारणासाठी शहराच्या अंतर्गत जायचे आहे , त्यांनी ऑनलाइन अर्ज विहित नमुन्यात भरून सबमिट करावा त्याची लिंक
https://tinyurl.com/Aurangabad-Commissionerate
आहे. तसेच सदरचा फॉर्म हा
www.aurangabadcitypolice.gov.in
संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे. सदर अर्जाची मंजुरीची अथवा ना मंजुरीची प्रत अर्जदाराच्या मोबाईल नंबर वर पाठवण्यात येईल. सदरची लिंक
या फेसबुक आणि ट्विटर वर देखील उपलब्ध आहे.या शिवाय नागरिक आपले अर्ज
या मेल वर देखील पाठवू शकतात.
औरंगाबाद जिल्ह्यातील लोकांसाठी लिंक…
ज्या लोकांना अत्यंत अत्यंत महत्त्वाच्या महत्त्वाच्या कारणांसाठी (तातडीची वैद्यकीय गरज, अत्यावश्यक सेवा) या करणासाठी बाहेरगावी जाण्याचे आहे, त्यांनी ऑनलाइन अर्ज विहित नमुन्यात भरून सबमिट करावा त्याची लिंक
आहे. तसेच सदरचा फॉर्म हा
www.aurangabadruralpolice.gov.in
संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे. सदर अर्जाची मंजुरीची अथवा ना मंजुरीची प्रत अर्जदाराच्या मोबाईल नंबर वर पाठवण्यात येईल
भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार 20 एप्रिल पासून सर्व शासकीय कार्यालये, सार्वजनिक क्षेत्रातील संस्था, स्थानिक संस्था कार्यालये, निम सरकारी संस्था यांना मर्यादित मनुष्यबळासह काम करण्याचे आदेश आहेत.
20 एप्रिलपासून किंवा लॉकडाऊन कालावधी दरम्यान विभाग प्रमुखांनी परवानगी दिलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उपास्थित राहायचे आहे. अशा परवानगी दिलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्या आणि जाण्यासाठी पासची आवश्यकता आहे. हा पास मिळविण्यासाठी
या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करता येईल. चौकशीनंतर देण्यात आलेला पास पोलिसांनी मागितला तर तो सादर करावा. केवळ कार्यालय प्रमुखांनी अधिकृत केलेल्या कर्मचार्यांना अर्ज करणे आवश्यक असणार आहे, अर्ज करताना अधिकृतता पत्र सादर करणे आवश्यक आहे, याची नोंद घ्यावी. तरी सर्व कर्मचाऱ्यांनी मास्क वापरणे बंधनकारक असून लॉक डाउन आदेशाचे तंतोतंत पालन करावे.