AurangabadCrimeUpdate : शहराच्या विविध भागात तिघांची गळफास घेवून आत्महत्या

औरंंंगाबाद : शहराच्या विविध भागात राहणा-या दोन महिला व एका पुरूषाने गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या केल्याच्या तिन्ही घटना एकाच दिवशी घडल्या असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली आहे.
हर्सुल परिसरातील सुरेवाडी येथे राहणा-या दिपाली सुनील गोरे (वय २४) या महिलेने मंगळवारी सायंकाळी पावणेपाच वाजेच्या सुमारास छताच्या हुकाला दोरीने बांधुन गळफास घेतला होता. दिपाली गोरे हिला उपचारासाठी घाटीत दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले. दुस-या घटनेत, गारखेडा परिसरातील शिवनेरी कॉलनी येथे राहणा-या अंजली सुनील चव्हाण (वय ३३) या महिलेने मंगळवारी साडेपाच वाजेच्या सुमारास राहते घरी छताच्या बल्लीला दोरीने बांधुन गळफास घेतला होता. अंजली चव्हाण यांना उपचारासाठी घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले. तिस-या घटनेत, हडको कॉर्नर परिसरातील भारतमाता नगर येथे राहणा-या नाना धर्माजी भालेराव (वय ५३) यांनी मंगळवारी बाथरूममध्ये जावून लोखंडी अँगलला कपड्याच्या सहाय्याने बांधुन गळफास घेतला होता. नाना भालेराव यांना उपचारासाठी घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले. वरील तिन्ही घटनांची नोंद अनुक्रमे हर्सुल, पुंडलिकनगर आणि सिटीचौक पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.