#CoronaVirusEffect : घरात इतर येऊन सामूहिक नमाज पठण , १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

राज्यात लॉकडाऊनचे आदेश जरी असताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सेलू (जि. परभणी ) येथील फुलेनगर भागातील खाजाखान पठाण यांच्या घरात सामूहिक नमाज पठण केल्या प्रकरणी १८ जणांविरुद्ध सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लॉकडाऊन आणि शहरात संचारबंदी लागू असताना काल शुक्रवारी (१७ एप्रिल ) दुपारी एकच्या सुमारास हे नमाज पठण होत होते. गस्तीवर असलेले उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, तहसीलदार बालाजी शेवाळे, पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर, नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांना एका घरात सामूहिकरित्या नमाज पठाण करण्यासाठी अनेक जण एकत्र आल्याचे दिसून आले. याप्रकरणी थारकर यांनी सेलू पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय नमाज पठणात सहभागी अन्य सहा अल्पवयीन असलेल्यांना नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
दरम्यान, यावेळी अधिकाऱ्यांनी या घराची पाहणी केली असता घरातील एका खोलीत याच परिसरातील स्वस्त धान्य दुकानदार अरुण कोरडे यांच्या दुकानातील तांदुळाचे सहा कट्टे आढळून आले. यावरून हे दुकान महसूल विभागाने सील केल्याची माहिती नायब तहसीलदार थारकर यांनी दिली. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या १८ आरोपीमध्ये खाजा खान साहेब खान, शेख सोएब, शेख शकील, शेख हबीब, असेफ खान, शेख शाहरुख, पठाण आल्ताब, सय्यद तोफिक, शेख शाहेद, समीर खाजा, लाला मुनीर, शेख अहमद, शेख शाहरुख, शेख शाहेद, शेख मेहबूब, शेख लाल, शेख मोइन, एजाज मोहम्मद आदींचा समावेश आहे.