पोलिसांची अशीही मानवता , चौघांनी दिला निराधार महिलेला खांदा

देशभरात निर्माण झालेली कोरोनाची दहशत आणि केंद्र लॉकडाऊन जाहीर केले आहे. अशावेळी अनेक अडचणीच्या प्रसंगावेळी पोलीस धाऊन आल्याचे पाहायला मिळाले. असाच एक माणुसकी दर्शविणारा प्रकार उत्तर प्रदेशातील सहारनपूर या भागात समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील एक निराधार महिलेला रूग्णालयात घेऊन तिच्यावर उपचार करण्यापासून ते तिच्या शेवटच्या श्वसापर्यंत तिची काळजी पोलिसांनी घेतली आणि तिचा मृत्यू झाल्यानंतर तिला खांदाही पोलिसांनी दिला.
https://twitter.com/thejadooguy/status/1250774801385488396
या विषयीची अधिक माहिती अशी कि , उत्तर प्रदेशातील सहारनपूर भागातील घटना असून बडगाव शहरातील किशनपुरा गावात राहणारी महिला कित्येक दिवसांपासून आजारी होती. तिच्या जवळ कोणीही नातेवाईक नसल्याने तिचे यादरम्यान चांगलेच हाल झाले. वयवर्ष ७५ असणाऱ्या या महिलेच्या पतीचे निधन झाल्यानंतर तिच्यावर दुखाःचा डोंगर कोसळली. पैसा नसल्याने तिच्यावर गरिबीची परिस्थिती ओढावली. त्यातच ती आजारी पडली याची माहिती उत्तर प्रदेश पोलीस पथकाला समजताच त्यांनी महिलेला आपल्या गाडीतून घेऊन जात रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. त्यांना कुणीही नातेवाईक नसल्यानं त्यांची काळजी पोलीसच घेत होते. उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती सोशल मीडियावर मिळताच बड़गांवच्या एसएसआय दीपक चौधरी यांनी त्या महिलेची भेट घेतली. उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. त्यावेळी दीपक चौधरी यांनी आपल्या पोलिस साथीदारांसह किशनपूर गावात शोक व्यक्त केला. त्यांनी या महिलेच्या पार्थिवाला खांदा देऊन अंत्ययात्रा काढली आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून पार्थिवावर अंत्यसंस्कारही केले. पोलिसांनी या महिलेच्या पार्थिवाला खांदा दिल्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून या प्रकारामुळे गावात त्या सर्व पोलिसांचे कौतुक देखील केले जात आहे.