#Aurangabad Crime : चोरीच्या दुचाकी विक्री करणारा गजाआड

औरंंंगाबाद : चोरी केलेल्या दुचाकी कोणतेही कागदपत्रे न देता विक्री करणाNयास स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी गजाआड केले. कागदपत्रे न देता दुचाकी विक्री करणाNयाच्या ताब्यातून पोलिसांनी १ लाख ५ हजार रूपये विंâमतीच्या ४ दुचाकी जप्त केल्या आहेत.
धनंजय उर्पâ धन्या पिंपळे (रा.हरेगांव, ता.श्रीरामपुर) असे चोरीच्या दुचाकी विक्री करणाNयाचे नाव आहे. श्रीरामपुर येथील महांकाळवाडगांव येथील नानासाहेब महादु दातीर (वय २२) याच्याकडे विनाक्रमांकाची व विनाकागदपत्रांची दुचाकी असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे ग्रामीण गुन्हे शाखेचे निरीक्षक भागवत पुंâदे, उपनिरीक्षक भगतसिंह दुलत, जमादार श्रीमंत भालेराव, सुनील खरात, नवनाथ कोल्हे, रमेश अपसनवाड, किरण गोरे, वाल्मीक निकम, संजय तांदळे आदींच्या पथकाने सापळा रचून नानासाहेब दातील याला ताब्यात घेवून चौकशी केली असता, त्याने सदरील दुचाकी धनंजय उर्पâ धन्या पिंपळे याच्याकडून घेतली असल्याचे सांगितले. तसेच गावातील दिपक दत्तात्रय बनकर (वय ३०), दादासाहेब दिलीप वानखेडे (वय २४), लक्ष्मण चांगदेव भागवत यांनाही धनंजय पिंपळे याच्याकडून दुचाकी घेवून दिल्या असल्याची माहिती दिली.
पोलिसांनी धनंजय उर्पâ धन्या पिंपळे याला ताब्यात घेवून चौकशी केली असता, त्याने विविध भागातून चोरलेल्या दुचाकी ग्रामीण भागात विनाकागदपत्रे विक्री केली असल्याचे पोलिसांना सांगितले.