#AurangabadNewsUpdate : जाणून घ्या ‘कोरोना’ आणि ‘सारी’ मधील फरक

कोरोना रुग्णाची चाचणी निगेटिव्ह आल्यास त्याच्यावर सारी चे उपचार केले जातात- डाॅ.झिने
औरंगाबाद – कोरोना रुग्णाची चाचणी निगेटिव्ह आली की त्याच्यावर सारी रोगाचे उपचार केले जातात(सिव्हिअर अॅक्यूट रिस्पेडरी इनफेक्शन) हा फुफुसाला जंतूसंसर्ग झाल्यावर होतो व तो संसर्गजन्यरोग नाही. तर कोरोना हा संसर्गजन्य रोग आहे. असे स्पष्टीकरण घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ.कैलास झिने यांनी दिले.
गेल्या दोन आठवड्यात सारी चे ११बळी गेले या माहितीला डाॅ. झिने यांनी दुजोरा दिला आहे.
सध्या देशभरात कोरोना विषाणू चे थैमान सुरु असतांना सारी च्या रुग्णांवरही उपचार केले जातात. सारी रुग्णांचे उपचार हे घाटी रुग्णालयात होतात तर कोरोनाचे जिल्हा रुग्णालयात होतात. दोन्ही रोगांचे लक्षण सारखी आहेत. त्यामुळे सारी आणि कोरोना रुग्ण प्रथम दर्शनी सारखेच दिसतात.फक्त कोरोना रुग्णाची स्वॅब टेस्ट केली जाते.ती टेस्ट पाॅझिटिव्ह आली तर कोरोनाचे उपचार केले जातात निगेटिव्ह आल्यास सारीचे उपचार केले जातात.सारी हा रोग जुना आहे. त्यामुळे सारी ची आणि कोरोनाचीही साथ शहसात सुरु आहे असे म्हणणे अतिशयोक्ती ठरेल.मुळात या दोन्ही रोगातील फरक नागरिकांनी समजावून घेणे आवश्यक आहे.तसे झाल्यास बरेचसे चित्र स्पष्ट होते.असेही डाॅ.झिने शेवटी म्हणाले.