Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad NewsUpdate : विवाहितेने केला हायकोर्टाच्या आदेशाने गर्भपात

Spread the love

औरंगाबाद – शहर परिसरात राहणार्‍या गर्भवती विवाहितेने सोनोग्राफी केल्यानंतर आलेल्या अहवालात गर्भातील बाळ जन्म देण्यायोग्य नाही असे कारंण पुढे आल्यामुळे विवाहितेने खंडपीठाच्या परवानगीने गर्भपात केला.
सहा महिन्याच्या गर्भवती महिलेने सोनोग्राफी मधे बाळ जन्म देण्यायोग्य नसल्याचा अहवाल खाजगी डाॅक्टर ने दिल्यानंतर त्या महिलेने घाटी रुग्णालयातील अॅडव्हायझरी कमिटीच्या सल्ल्याने खंडपीठात धाव घेतली. खंडपीठाने खाजगी डाॅक्टरने दिलेला अहवाल आणि त्यावर घाटीतील अॅडव्हायझरी कमिटीने केलेले मार्गदर्शन या दोन्ही गोष्टी विचारात घेत.न्या.प्रसन्ना वराळे  यांंनी गर्भवती महिलेला गर्भपाताची परवानगी दिली.यावेळी खंडपीठाने चंदीगडच्या सुचिता श्रीवास्तव प्रकरणाचा दाखला विचारात घेतला.कोणत्याही गर्भवती महिलेला गर्भपात करण्याचा पूर्ण अधिकार असतोअसा निकाल श्रीवास्तव प्रकरणात देण्यात आलेला आहे. या प्रकरणी अॅड. डी. एस. मनूरकर यांनी याचिका कर्त्याची बाजू मांडली होती,

आपलं सरकार

Click to listen highlighted text!