#CoronaVirusUpdate : औरंगाबादकरांसाठी कडक बातमी , आज आणि उद्या सायंकाळी सात नंतर बाहेर पडाल तर फटके , कर्फ्यूची घोषणा…

औरंगाबाद शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावरच्या लोकांना आवरण्यासाठी आज आणि उद्या शहराचे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी कडक संचार बंदीचा आदेश जारी केला असून आज दिनांक ८ एप्रिल रोजी काढलेल्या आदेशानुसार त्यांनी म्हटले आहे की, फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 कलम 144 (1) (3) प्रमाणे मनाई आदेश देण्यात आला आहे. या आदेशानुसार औरंगाबाद शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात वैद्यकीय सेवा वगळता सर्व प्रकारच्या अस्थापना दिनांक ८ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजल्यापासून ते रात्री ११ वाजेपर्यंत तसेच दिनांक ९ एप्रिल रोजी रात्री ७ ते ११ वाजेपर्यंत कडक संचारबंदी ( कर्फ्यू ) लागू राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी असे आवाहन ध्वनिक्षेपकावरून करण्यात येत होते.
याबाबत बोलताना पोलिस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील म्हणाले कि , आज पासून न दोन दिवस संध्याकाळी ७ ते ११ तासांची कडक संचारबंदी कडक करण्यात आली आहे. तसेच गल्ली बोळात घोळक्याने जमा होणार्या टोळक्यांवरही येथून पुढे कडक कारवाई केली जाईल. तसेच प्रायोगिक तत्वावरील दोन तासासाठी कडक करण्यात आलेली संचारबंदी १४ एप्रिल पर्यंत सुरुच ठेवण्याचा मानस असल्याचेही ते म्हणाले. संचारबंदीच्या काळात शहरवासियांनी बर्यापैकी सहकार्य केले आहे. पण गल्लीबोळात घोळके करुन गप्पा मारणार्या टोळक्यांवर यापुढे कडक कारवाई केली केली जाणार आहे.
दरम्यान २१ दिवसांचा लॉकडाऊन संपल्यानंतर काय? करोना व्हायरस लॉकडाऊन लागू होण्यापूर्वी नागरिक जसे मोकळेपणाने फिरत होते तसंच १५ एप्रिलनंतर फिरता येईल काय? हा प्रश्न सध्या अनेकांना सतावतो आहे . २१ दिवसांचा लॉकडाऊन संपण्याची तारीख जवळ येतेय तसं केंद्र सरकार आणि राज्य सरकार नियंत्रण कसं राखता येईल? याचा जास्तीत जास्त विचार करताना दिसत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, १४ एप्रिल रोजी लॉकडाऊन संपलं तरी नागरिकांना मात्र काही अटींसहीत घराच्या बाहेर पडता येईल. म्हणजेच, तुम्हाला घराबाहेर तर पडता येईल पण काही नियम पाळून…दरम्यान कोविड-१९ साठी बनवण्यात आलेल्या विशेष मंत्रिमंडळ गटाची मंगळवारी एक बैठक पार पडली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली या गटानं गाड्यांसाठी ऑड-इव्हन नियम लागू करण्याविषयी आणि सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांमध्ये लोकांची संख्या निश्चित करण्याचे पर्याय सूचवले आहेत. याशिवाय कारमध्येही किती लोक असावेत, या संख्येवर मर्यादा येऊ शकते. मॉल आणि शाळा १५ मेपर्यंत बंद ठेवण्याची सूचनाही या मंत्रिमंडळ गटानं केली आहे. धर्मस्थळांवर बंदी कायम राहू शकते.