#CoronaVirusUpdate : जालना शहरातील ६५ वर्षीय महिला कोरोनाबाधित

जालना शहरातील दु:खीनगर भागातील ६५ वर्षीय महिला रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे जिल्हा शल्य चिकित्स यांच्या अहवालानुसार निष्पन्न झाले आहे. या रुग्णाची हैद्राबाद प्रवासाची तर त्यांच्या नातेवाईकांचा दिल्ली प्रवासाचा इतिहास असल्याचे समजले या रुग्णास दि. ३१ मार्च २०२० रोजी डॅा.बद्रुद्दीन रुग्णालय दु:खीनगर व निरामय रुग्णालय जालना या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. निरामय रुग्णालय जालना यांनी त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी पाठविले असता दि. ३ एप्रिल २०२० रोजी ते रुग्ण दाखल झाले असता त्यांना विलगीकरण कक्षात दाखल केले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. तातडीची खबरदारीची उपाययोजना म्हणुन या रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्या तपासण्या व अलगीकरणाची कार्यवाही प्रशासनाकडुन केली जात आहे. या महिलेच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील १५ व्यक्ती, डॉ. बद्रुद्दीन रुग्णालयातील ६, निरामय रुग्णालयातील १४ असे एकुण ३५ व्यक्तींचे स्वॅबचे नमुने आज दि. ६ एप्रिल २०२० रोजी घेण्यात येणार असून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येतील. तसेच सामान्य रुग्णालयातील रुग्णांच्या संपर्कात आलेल्या २० कर्मचा-यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील शहागड येथील २६ नागरीकांची खबरदारीची उपाययोजना म्हणुन सामान्य रुग्णालय जालना येथे दि. ४ एप्रिल २०२० रोजी तपासणीसाठी आणण्यात आले होते. त्यांच स्वॅबचे नमुने पुणे येथे पाठविण्यात आले असता त्यांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यांचे स्वॅब निगेटिव्ह आले आहेत. तर दि.५ एप्रिल रोजी शहागड येथील २० व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल अद्याप अप्राप्त आहे. जालना जिल्ह्यामध्ये दि. ६ एप्रिल २०२० रोजी ३७ रुग्ण नव्याने दाखल झाले आहे आतापर्यंत एकुण २१३ रुग्ण विलगीकरण कक्षात दाखल होते त्यापैकी २१३ रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले असून त्यापैकी १७५ रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले आहे. यात १७१ निगेटिव्ह व १रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून ३ नमूने रिजेक्ट केले.३८ नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे. आजरोजी ९४ रुग्ण विलगीकरण कक्षात दाखल असून ९३ रुग्णांची प्रकृती स्थिर आहे तर एका रुग्णाची प्रकृती गंभीर आहे.
संस्थेत अलगीकरण केलेल्या सहवाशितांची (Contact) संख्या १३७ असून संत रामदास मुलांचे शासकीय वसतीगृह येथे ४७, बाबासाहेब आंबेडकर वसतीगृहामध्ये ३९, मुलींचे शासकीय वसतीगृह येथे ३८ जणांना दाखल करण्यात आलेले आहे. तर मंठा तालुक्यात १३ जणांना दाखल करण्यात आले आहे. दु:खीनगर परिसर आज दि.६ एप्रिल २०२० पासून सील करण्यता आलेला असून पुढील १४ दिवस हा परिसर बंद असुन नागरीकांनी काळजी करुन नये जिल्हा प्रशासनाने योगय त्या उपाययोजना केल्या आहेत. जिल्हा सामान्य रुग्णलयाच्या शेजारी उभारण्यात येत असलेल्या १५० खाटांचे स्वतंत्र कोरोना दवाखान्याच्या कामाची पाहणी आज दि. ६ एप्रिल २०२० रोजी केंद्रीय अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली असून त्यांनी समाधान व्यक्त केले तसेच काम लवकरात लवकर पुर्ण करावे अशा सुचना दिल्या. यावे त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे हे उपस्थित होते.