#CoronaVirusUpdate : Aurangabad : दोन पाॅझिटिव्ह सापडल्याने खळबळ, एन ४ सिडकोतील काही परिसर सील- उपायुक्त खाडेंची माहिती

औरंगाबाद – शहरात कोरोनाचे दोन पाझिटिव्ह रुग्ण सापडल्यानंतर एन४सिडको परिसरातील पाॅझिटिव्ह रुग्णाच्या घराजवळील ५० घरे सील करण्यात आल्याची माहिती पोलिसउपायुक्त डाॅ राहुल खाडे यांनी दिली.
तीन आठवड्याभरापुर्वी औरंगाबाद शहरात कोरोनाचा एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता. मात्र, उपचाराअंती तो रुग्ण पुर्णपणे बरा झाला. शिवाय मागील तीन आठवड्यात नवीन एकही कोरोना पॉझिटिव्ह आढळला नव्हता. त्यामुळे औरंगाबादकर काहीसे बेकीफीर हेाते. मात्र, औरंगाबादेतील कोरोनाचा धोका टळला नसल्याचे गुरूवारी स्पष्ट झाले. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसोलेशन कक्षात उपचार घेत असलेल्या दोघा रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात शहरातील आरेफ कॉलनीतील २१ वर्षीय तरुण आणि सिडको एन फोर येथील ५५ वर्षीय महिलेचा समावेश आहे.
मुंबई, पुण्याहून औरंगाबाद शहरात परतलेल्या व शहराच्या वेगवेगळ्या भागांत राहणाऱ्या दोघांना (एक पुरुष, एक महिला) सर्दी, खोकला, ताप, घसा दुखणे अशी लक्षणे आढळून आली. त्यांची जिल्हा रुग्णालयात तपासणी करण्यात आली. संशयित असल्यामुळे त्यांना दोन दिवसांपूर्वी आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांचे स्वॅब नमुने घाटीच्या व्हीआरडीएल लॅबमध्ये पाठविण्यात आले होते. त्यानंतर बुधवारी दोघांचा स्वॅब अहवाल प्राप्त झाला होता. मात्र त्याबाबत गुप्तता पाळण्यात आली होती. आज गुरूवारी जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी हे दोन्ही नमुने पॉझिटिव्ह आल्याचे जाहीर केले.