#CoronaVirusEffect : ३१ मार्चपर्यंत अत्यंत तातडीच्या कामासाठीच जिल्हा न्यायाधीश न्यायालयात येतील…

देशात आणि राज्यात निर्माण झालेल्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुंबई हाय कोर्ट बरोबरच जिल्हास्तरीय न्यायालयांना सुद्धा मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश प्राप्त झाले असून या आदेशानुसार दि. २४ ते ३१ मार्च २०२० या काळात अत्यंत तातडीची काम असतील तरंच न्यायधीशांनी कोर्टात यावे असे आदेश आज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीपाद टेकाळे यांनी काढले आहेत.
आदेशात म्हटले आहे की , न्यायिक अधिकारी व कर्मचार्यांव्यतिरिक्त जिल्हा न्यायालय व तालुकास्तरावरील सर्व न्यायीक अधिकारी कर्मचारी यांनी २४ ते ३१ मार्च या काळात कार्यालयात हजर राहण्याची आवश्यकता नाही.मात्र प्रशासन विभाग, लेखा, नक्कल विभाग , आवक जावक,संगणक,न्यायिक या विभागातील प्रत्येकी एक कर्मचारी कामकाजाच्या दिवशी आपापसात ठरवून कार्यालयात हजर राहतील