Aurangabad Crime : अवैधरित्या दारूचा साठा करणारा गजाआड

औरंंंगाबाद : अवैधरित्या देशी दारूचा साठा करणाNयास गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले. संजयसिंग चव्हाण (वय २७, रा.धनगरगल्ली, हर्सुल) असे दारूचा साठा करणाNयाचे नाव असून त्याच्या ताब्यातून पोलिसांनी ३२ हजार ३२ रूपये विंâमतीचे देशी दारूचे १३ बॉक्स जप्त केले आहेत.
संजयसिंग चव्हाण याने हर्सुल परिसरातील रहिवासी प्रकाश दुधे यांच्या घरासमोरील अंगणात असलेल्या झाडाजवळील पलंगाखाली देशी दारूचा अवैधरित्या साठा केला असल्याची माहिती गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त डॉ.नागनाथ कोडे, पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक गौतम वाव्हळे, सहाय्यक फौजदार रामदास गायकवाड, शेख नजीर, जमादार चंद्रकांत गवळी, सुधाकर राठोड, सुधाकर मिसाळ, रविंद्र खरात, आनंद वाहुळ आदींच्या पथकाने छापा मारून संजयसिंग चव्हाण याला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून पोलिसांनी देशी दारूचे १३ बॉक्स जप्त केले आहेत.