#CoronaVirusUpdate : स्वतःचा आजार लपवून तिने अनेक पार्ट्यांना हजेरी लावली आणि आता म्हणतेय … “टेक केअर !!”

अफवांसंबंधी तक्रार करण्यासाठी केंद्र सरकारने व्हॉट्सअॅप नंबर जारी केला- 9013151515
इंडियन काउन्सिल ऑफ मेडीकल रिसर्च (ICMR)ने आज देशातील करोनाच्या रुग्णांची आकडेवारी जारी केली. १३, ४८६ रुग्णांचे १४, ३७६ नमुने आतापर्यंत तपासण्यात आले आहेत. देशातील रुग्णांची संख्या वाढून देशात करोनाग्रस्तांची एकूण संख्या २२३ झाली असून पीडितांमध्ये ३२ परदेशी नागरिकांचा समावेश आहे. देशात सर्वाधिक करोनाचे रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. येथील करोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रात करोनाच्या रुग्णांची संख्या ५२ झाली आहे. त्यानंतर खालोखाल केरळमध्ये करोनाचे २८ रुग्ण आहेत यामध्ये १२ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. आंध्र प्रदेशात ३, दिल्ली १२, हरियाणा १७, कर्नाटक १५, केरळ २८, पंजाब १, राजस्थान ९, तामिळनाडू ३, तेलंगणा १६, जम्मू काश्मीर ४, लद्दाख ८, उत्तर प्रदेश २३, उत्तराखंड ३, ओदिशा २, गुजरात २, पश्चिम बगाल २, चंदीगड १, पुद्दुचेरी १ आणि छत्तीसगडमध्ये १ रग्ण आढळून आला आहे. जगभरात थैमान घालणारा करोना भारतातील १९ राज्यांमध्ये फैलावला आहे. सुरुवातीला दिल्ली, केरळमध्ये असलेला करोना महाराष्ट्र, कर्नाटक छत्तीसगड, पश्चिम बंगाल, पंजामसह अनेक राज्यांमध्ये पसरला आहे. देशात करोनाचे २०६ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी २५ हे विदेशी नागरिक आहेत. तर आतापर्यंत करोनाने ४ जणांचा मृत्यू झाला आहे.
देशभर लोक कोरोनाची काळजी घेत असताना आणि सरकारकडून खबरदारी घेण्याचे आवाहन करीत असतानाही बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका कनिका कपूरने स्वतःची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आलेली असतानाही लोकांसोबत पार्ट्या केल्याने खळबळ उडाली आहे. तिच्या या कृत्यामुळे सोशल मीडियावर टीकेचे मोहोळ उठल्यानंतर आता मात्र ” आपल्या इंस्टाग्रामच्या अकाऊंट वरून लोकांना “टेक केअर” चा सल्ला दिला आहे. कनिका १५ मार्चला लंडनहून भारतात परतली होती. धक्कादायक बाब म्हणजे कनिकाने करोना विषाणूशी पीडित असल्याची गोष्ट लपवली आणि शहरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राहिली. तिथेच तिने पार्टीही दिली होती. या पार्टीला सुमारे ५०० लोक उपस्थित होते. आता आरोग्य विभाग कनिकाच्या पार्टीला उपस्थित राहिलेल्या लोकांचा शोध चालू आहे. कनिकाच्या पार्टीत उपस्थित असलेल्या सर्वांची चाचणी करण्यात येईल आणि त्यांच्यात करोनाचे लक्षण दिसले तर त्यांना लगेच आयसोलेशनमध्ये ठेवले जाईल असे सांगण्यात येत आहे.
वृट असेही आहे कि , कनिकाने फक्त एक पार्टीच दिली नाही, तर लखनऊ येथील अनेक पार्ट्यांना तिने हजेरीही लावली होती. मीडिया रिपोर्टनुसार, माजी खासदारांच्या घरी पार्टीलाही गेली होती. तसेच शहरातील प्रसिद्ध कोट्याधिशाच्या घरी डिनरलाही कनिका गेली होती. या पार्टीत उत्तर प्रदेशमधील अनेक नेते आणि अधिकारी उपस्थित होते. कनिका कपूर हे बॉलिवूडमधील नावाजलेलं नाव आहे. तिने बेबी डॉल मैं सोने यांसारख्या हिट गाण्यांना आवाज दिला आहे. याशिवाय ती काही सिंगिंग रिअॅलिटी शोची जजही होती. सध्या सोशल मीडियावर कनिकाला ट्रोल करण्यात येत आहे आणि तिला सुशिक्षित अडाणीही म्हणत आहेत. कारण कनिकाच्या एक चुकीमुळे अनेक लोकांचे प्राण धोक्यात आले आहेत. सध्या कनिका आणि तिच्या घरच्यांना आयसोलेट करण्यात आले आहे आणि तिच्यावर उपचार सुरू आहेत.
https://www.instagram.com/p/B98tXqnFqE2/
दरम्यान कनिका कपूरच्या पार्ट्यांना हजेरी लावलेले उत्तर प्रदेशातील अनेक आमदार , नेते यांनी आपला कोरोना अहवाल येईपर्यंत स्वतःला आयसोलेशन मध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तिच्या भेटीचा आणि पार्टीचा अनेकांनी चांगलाच धसका घेतला आहे.
UP MLAs Pankaj Singh, Dhirendra Singh and Tejpal Nagar have self-isolated themselves till the #COVID19 test reports of state Health Minister Jai Pratap Singh comes. Jai Singh was in the party that was also attended by singer Kanika Kapoor who has tested positive for Coronavirus. https://t.co/F3Suei8gMl
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) March 20, 2020