#CoronaVirusUpdate : कोरोना व्हायरस जैविक युद्धाचा भाग आहे का ? जाणून घ्या चीनने पहिल्यांदाच अमेरिकेवर जाहीरपणे केलेला हा आरोप !!

कोरोना व्हायरसने चीन नंतर जगभरात उच्छाद मांडलेलं असताना चीन आणि अमेरिकेमध्ये यावरून चांगलीच तू -तू -मै -मै रंगणार असे दिसत आहे. कारण जगभर हातपाय पसरत चाललेला कोरोना व्हायरस हा खरोखर नैसर्गिक आपत्तीसारखा उद्भवलेला आजार आहे की कुणी जाणीवपूर्वक रचलेला युद्धनीतीचा डाव आहे, हा प्रश्न सर्वत्र चर्चिला जात असताना चीनने प्रथमच याविषयी जाहीर वाच्यता करत थेट अमेरिकडे बोट दाखवून संशय व्यक्त केला असल्याचे वृत्त आहे. दोन देशातला हा वाद आणखी वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने आरोपानुसार गेल्या ऑक्टोबमध्ये चीनच्या वुहान शहरात जागतिक सैन्य क्रीडा स्पर्धा आयोजित केली होती, त्यावेळी अमेरिकन सैन्याच्या टीमने या व्हायरसला शहरात मुद्दाम प्लांट केलं. या मुद्दाम पसरवलेल्या मानवनिर्मित व्हायरसमुळे वुहान शहरकोरोना व्हायरसच्या भक्ष्यस्थानी पडलं आणि शेकडोंच्या संख्येने या शहरात मृत्यू झाले. या शहरातूनच Covid-19 ची साथ जगभर पसरली. दरम्यान कोरोना व्हायरसने आता जगभरात हातपाय पसरले आहेत. आजपर्यंत १६२ देशांमध्ये कोरोनाव्हायरस पोहोचला आहे. जगभरात या व्हायरसने ७१०० हून जास्त लोकांचा बळी घेतला आहे तर जवळपास दोन लाख लोकांना या व्हायरसने घेरले आहे . त्यात चीन बरोबर अमेरिकेलाही समावेश असून या व्हायरसला निपटण्यासाठी अमेरिकेने आणीबाणी घोषित केली आहे. अमेरिकेत कोरोनाव्हायरसमुळे आतपार्यंत ८५ जणांचा मृत्यू झाला आहे. ४, ६३८ लोकांना या व्हायरसची लागण झाली आहे.
2/2 CDC was caught on the spot. When did patient zero begin in US? How many people are infected? What are the names of the hospitals? It might be US army who brought the epidemic to Wuhan. Be transparent! Make public your data! US owe us an explanation! pic.twitter.com/vYNZRFPWo3
— Lijian Zhao 赵立坚 (@zlj517) March 12, 2020
दरम्यान चीनच्या माध्यमांनी आणि सोशल मीडियाने हा व्हायरस मुद्दाम निर्माण केला गेला असावा आणि अमेरिकेचा हा चीनविरोधातला डाव असावा, असा दावा यापूर्वीही केला होता. खुद्द अमेरिका आणि रशियातल्या माध्यमांमधूनही ही चर्चा सुरू झालेली आहे. पण १५ मार्चला प्रथमच चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने अधिकृतपणे यामागे अमेरिका असल्याचा थेट आरोप केला. चीन, रशिया आणि इराणने ही अमेरिकेचीच हि जाणून बुजून रचलेली चाल आहे, असा आरोप केला आहे. कोरोनाव्हायरसच्या माध्यमातून चीनची अर्थव्यवस्था खड्ड्यात घालण्याचा यामागचा डाव असल्याचं या देशांचं म्हणणं आहे. सीएनएनने प्रसिद्ध केलेल्या बातमीतच याचा उल्लेख केला आहे. ‘१५ मार्चला प्रथमच चिनी परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते लिजियान झाओ यांनी ट्वीट करून अमेरिकन सैन्याची ही चाल असल्याचा आरोप केला आहे’, असं वृत्त सीएनएनने दिलं आहे. “अमेरिकन सैन्याने कोरोना व्हायरस मुद्दाम चीनमध्ये सोडला”, असं या ट्विटमध्ये लिजियान यांनी लिहिलं आहे. लिजियन झाओ हे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयातल्या माहिती विभागाचे उपव्यवस्थापक आहेत आणि प्रवक्तेही आहेत.
चीनच्या आरोपानुसार गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये चीनमध्ये World Millitry Games झाले होते. या जागतिक सैन्यदलांच्या क्रीडास्पर्धेत अमेरिकन सैन्याची टीमसुद्धा सहभागी झाली होती. या स्पर्धा वुहान शहरात आयोजित करण्यात आल्या होत्या. अमेरिकन सैन्यदलाची टीम जिथे उतरली होती, तिथून वुहानचं बहुचर्चित सी-फूड मार्केट म्हणजेच मच्छीबाजार जवळच आहे. इथूनच हा व्हायरस शहरात पसरल्याचं सांगितलं जातं. या जागतिक क्रीडा स्पर्धा संपल्यानंतर लगेचच वुहानमध्ये या रहस्यमय आजाराची साथ सुरू झाली. सुरुवातीला ही साथ असल्याचं लक्षात आलं नाही, कारण लक्षणं सर्वसामान्य आणि सौम्य होती. पण एकापाठोपाठ एक मृत्यू होऊ लागल्यानंतर या साथीचं रौद्र रूप समोर आलं आणि चीनच नाही, तर अवघं जग हादरलं आहे. चीनमध्ये अमेरिकेने खेळण्यासाठी पाठवलेल्या अॅथलिट्सच्या टीमनेच हा विषाणू वुहानच्या बाजारात पेरला, असा चीनचा संशय असल्याने त्यांनी अमेरिकेवर हा थेट आरोप केला आहे.