Aurangabad Crime : संग्राम नगर उड्डाणपुलाखाली तरुणाचा निर्घृण खून

औरंगाबादच्या शहानूरमिया दर्गा परिसरातील संग्राम नगर उड्डाण पुलाच्या पूर्वेला म्हाडा कॉलनी समोरील मैदानात, रेल्वे रुळाजवळ अक्षय अंकुश प्रधान , वय अंदाजे २५ याचा धारदार शास्त्राने कुणी केल्याची खळबळजनक घटना रात्री ९.३० ते १० वाजण्याच्या सुमारास घडली. हि घटना घडताच या भागातील विशेष पोलीस अधिकारी श्रीमंत गोर्डे पाटील यांनी या घटनेची प्राथमिक माहिती जवाहर नगर पोलिसांना दिली. हि माहिती मिळताच जवाहर नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अक्षय अंकुश प्रधान याला गंभीर जखमी अवस्थेत घाटी रुग्णालयात नेले परंतु तो वाचू शकला नाही. या तरुणाविषयीची कुठलीही सविस्तर माहिती मिळू शकली नाही.
रात्री उशिरापर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल झाला नव्हता. दरम्यान पोलिसांनी सांगितले त्यांना प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार संग्राम नगर उड्डाणपुलाजवळ रात्रीच्या वेळेस अनेक गुंड तरुणांचा वावर असतो. यातील अनेक गुन्हेगार हे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत. या टोळक्यांपैकी काही तरुणांमध्ये शिवीगाळ झाली आणि त्याचे पर्यवसान खुनात झाले. अंकुश प्रधान खाली कोसळल्यानंतर हल्लेखोर तेथून पसार झाले. घटनास्थळावर खून झालेल्या युवकाची दुचाकी आढळून आली . या दुचाकींचा नंबर एम एच -२२ , ए . जी. ७३५७ असा आहे. मयताच्या मानेवर मानेवर चाकूने वार करून त्याचा खून करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू होती. अधिक तपशील मिळू शकला नाही. जवाहर नगर पोलीस अधिक तपस करीत आहेत.