Aurangabad Crime : “त्या ” तरुणाचा खून करणारा अटकेत , दुसरा फरार

औरंगाबाद – जवाहरनगर परिसरात अक्षय प्रधान नावाच्या तरुणाचा खून करणारा रेकाॅर्डवरच्या गुन्हेगाराला गुन्हेशाखेने आज पहाटे (१७/०३)पावणेपाच वा. अटक केली.त्याच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे. व पुढील कारवाईसाठी जवाहरनगर पोलिसांकडे सूपूर्द केले.
इम्रान अमीर बेग(२५) रा.काबरानगर असे अटक आरोपीचे नाव असून तो रेकाॅर्डवरचा गुन्हेगार आहे.त्याचा साथीदार सोहेलशेख हा फरार झाला आहे.
सोहेल आणि इम्रान ने सोमवारी रात्री साडेआठ वा.जवाहरनगर परिसरातील मोकळ्यामैदानावर किरकोळ कारणावरुन जिवंत पकडलेल्या सापाची भिती दाखवंत अक्षय प्रधानचा खून केला.व त्याच्या जवळील ४००रु.हिसकावून पळ काढला होता. या प्रकरणी सोमवारी रात्री उशीरा अक्षय चा मित्र अमेय भोसलेच्या फिर्यादीवरुन जवाहरनगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. वरील कारवाईगुन्हेशाखेचे पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय योगेश धोंडे पोलिस कर्मचारी मुजीबअली, राजेंद्रसोळुंके,तुकाराम राठोड यांनी पार पाडली.