Aurangabad : सुहास दाशरथे केंव्हाही शिवसेनेत परतू शकतात : चंद्रकांत खैरे

औरंगाबाद – महाराष्र्ट नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे केंव्हाही शिवसेनेत परतू शकतात ते आम्ही पाठवलेले दूत आहेत.असे स्पष्टीकरण शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी “महानायक ऑनलाईन” शी बोलतांना दिले. सुहास दाशरथे यांनी काल चंद्रकांत खैरेंना आगामी महापालिका निवडणूकीत टक्कर देणार असे उद्गार काढल्यानंतर खैरेंनी वरील स्पष्टीकरण दिले.गेल्या १८वर्षापासून सुहास दाशरथे शिवसेनेत होते. पण त्यांना अपेक्षित असलेली जबाबदारी शिवसेनेने त्यांच्यावर सोपवली नाही म्हणून गेल्या महिन्यात दाशरथे यांनी राज ठाकरेंची भेट घेत महाराष्र्ट नवनिर्माण सेनेत प्रवेश केला.त्यांच्या शिवसेनेतून बाहेर पडण्यामुळे शिवसेनेला फार मोठा धक्का बसल्याची चर्चा शहरात रंगत आहे.या विषयी शिवसेना नेते खैरे यांचे लक्ष वेधले असता त्यांनी वरील स्पष्टीकरण दिले