महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०२० : ‘शिवभोजन’ योजनेत दररोज एक लाख लोकांना शिवभोजन देण्या मानस , तृतीय पंथीयांसाठीही मोठो घोषणा…

राज्याच्या नव्या अर्थसंकल्पात गरीब आणि गरजूंना फक्त १० रुपयांत जेवणाची थाळी देणाऱ्या ‘शिवभोजन’ योजनेला सरकारने आर्थिक बळ दिलं आहे. दररोज एक लाख शिवभोजन थाळी देण्याचे उद्दिष्ट सरकारनं ठेवलं आहे. यासाठी १५० कोटींची तरतूद अर्थमंत्री अजित पवार यांनी घोषीत केली. पवार यांनी आज विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर केला.
२६ जानेवारीपासून राज्यभरात ‘शिवभोजन’ योजनेची अंमलबजावणी झाली होती. याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे सरकारने या योजनेला आर्थिक बळ दिलं आहे. सरकारतर्फे सुरू करण्यात आलेल्या या शिवभोजन योजनेंतर्गत भोजनालयात प्रत्येकी ३० ग्रॅमच्या दोन चपात्या, १०० ग्रॅम भाजी, १०० ग्रॅम भात, १०० ग्रॅम वरण असलेली थाळी अवघ्या १० रुपयांत देण्यात येणार आहे. रोज १ लाख शिवभोजन थाळी देण्याचा सरकारचा मानस आहे. शिवभोजन थाळी केंद्रांवर ५०० थाळी देण्यात येत असून त्यांची संख्या आता वाढवली जाईल. शिवभोजन थाळीसाठी १५० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आल्याच पवार यांनी सांगितले. यामुळे जास्तीतजास्त गरीब आणि गरजूंना याचा लाभ मिळणार आहे.
तृतीयपंथीयांसाठीही मोठी घोषणा
दरम्यान तृतीयपंथीयांना समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी रख्य सरकारने आज अर्थसंकल्पात मोठी घोषणा केली. राज्य सरकारने तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केली. या मंडळाच्या माध्यमातून तृतीयपंथीय समाजासाठी कल्याणकारी योजना राबवल्या जाणार आहेत. त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ देण्यासाठी मराठी भाषेत हेल्पलाईन सुरु केली आहे. तृतीयपंथीयांना सामाजिक , शैक्षणिक आणि आर्थिक समस्या सोडवण्यासाठी हे मंडळ काम करेल. पुढील २० दिवसांत हे मंडळ सुरु होईल, असे अजित पवार यांनी भाषणात सांगितले.